अखेर कोविडनं गाठलंच.. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अखेर कोविडनं गाठलंच.. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे.

  • Share this:

जालना, 13 सप्टेंबर: राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. त्या एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्जुन खोतकर आता मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत.

हेही वाचा...प्रेमीयुगुलांचा भयानक अंत! जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकी लेकीचा संसार

अर्जुन खोतकर यांनी स्वत: फेसबूकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अखेर कोविडनं गाठलंच.. असं सांगत अर्जुन खोतकर यांनी सांगितलं की, 'लोक संकटात असतांना नेतृत्त्वानं घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करतांना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशीर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित रहावे'

दुसरीकडे, राज्यात आज (रविवारी) दिवसभरात 22 हजार 543 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 416 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या आहे. तर . राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10 लाख 60 हजार 308 एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच दुसरी चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर हा 69.8 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर 2.79 एवढा आहे. 2 लाख 90 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट हे कायम आहे. हे संकट असताना राजकीय वादळ उठत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच, लोकल सेवा, रेस्टॉरंट सुरू करण्यात येईल, याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

हेही वाचा...‘ठाकरे हा ब्रँड कोण जपतंय हे जगाला माहीत आहे’ मनसे नेत्याचं राऊतांना उत्तरं

आता सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून नक्की बोलेल. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या