जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डोळ्यासमोर मित्र पाण्यात बुडत होता, सुजयने उडी घेतली आणि भयंकर घडलं, यवतमाळमधील घटना

डोळ्यासमोर मित्र पाण्यात बुडत होता, सुजयने उडी घेतली आणि भयंकर घडलं, यवतमाळमधील घटना

यवतमाळमधील घटना

यवतमाळमधील घटना

ऋषभ आणि सुजय हे दोघे मित्र यवतमाळच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजला शिकत होते.

  • -MIN READ Yavatmal,Maharashtra
  • Last Updated :

भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, 13 मे : यवतमाळमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये तीन जणांचा पाण्यातून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजला शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत एक 14 वर्षीय मुलगा पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांचा मृतदेह सापडला आहे तर एकाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ बजाज आणि सुजय काळे अशी मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. ऋषभ आणि सुजय हे दोघे मित्र यवतमाळच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजला शिकत होते. आज काही मित्रांसह ते कापरा येथे तलावात पोहण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ऋषभ बुडाला त्याला वाचविण्यासाठी सुजयने तलावात उडी घेतली असता तोही बुडाला. या घटनेची माहिती मित्रांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. (किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला होणार अटक? प्रकरणाला वेगळं वळण) दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शोध घेतला असता ऋषभ बजाज याचाच मृतदेह त्यांना आढळून आला तर सुजयचा शोध सुरू आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे कॉलेज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरी घटना यवतमाळ शहराला लागून असलेल्या टाकळी इथं घडली. करण देविदास रामगडे हा 14 वर्षीय युवक टाकळी येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच NDRF पथकाने घटनास्थळी धाव घेतली. करणचा शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला. जिल्ह्यात घडलेल्या दोन्ही घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून दरम्यान, यवतमाळ शहरातील गिलानीनगर येथील विजय दामोदर तोळे हा तरुण गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होता. या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून कमला पार्क येथील ऐका पडीत बांधकामाच्या ठिकाणी खून झाल्याचे उघडकीस आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात