जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला होणार अटक? प्रकरणाला वेगळं वळण

किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या आमदाराला होणार अटक? प्रकरणाला वेगळं वळण

किशोर आवारे हत्या प्रकरणाला वेगळं वळण

किशोर आवारे हत्या प्रकरणाला वेगळं वळण

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

मावळ, 13 मे : तळेगाव दाभाडे (ता. मावळ,जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची चार हल्लेखोरांनी काल (12 मे) भरदिवसा नगरपरिषद कार्यालयासमोरच निर्घूण हत्या केली. या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह  सात जणांवर हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे आरोप आमदार सुनील शेळके यांनी फेटाळलेत. काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही शेळके यांनी म्हटलं आहे. यात राजकारण करून आपल्याला गोवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मावळच्या तळेगावात किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनं तळेगावात खळबळ उडाली. या प्रकरणी चार मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चार आरोपी अटकेत सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य चार आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना आज वडगांव मावळातील जिल्हा व अति, सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आले. या हल्लेखोरांच्या जबानीतून आमदार शेळके यांना अटक होणार की नाही, हे ठरणार आहे. त्यांचे मोबाईलच संभाषण (सीडीआर) काढून पोलीस तपास करतील. त्यात व हल्लेखोरांच्या स्टेटमेंटमध्ये आ.शेळकेंचे नाव आले, तर मात्र त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. वाचा - मित्रांना घेऊन प्रेयसीला भेटायला आला, अचानक कारमध्ये बिघाड झाला आणि… किशोर आवारे यांच्या आई आणि तळेगावच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना यांच्या फिर्यादीनुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी याप्रकरणी काल रात्रीच गुन्हा दाखल केला. त्यानंतर आमदार शेळकेंचा फोन बंद येत आहे. दुसरीकडे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आवारेंवर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान, या हत्येनंतर काल व आजही तळेगाव येथे काही भागात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Murder
  • First Published :
जाहिरात
जाहिरात