• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • हृदयद्रावक ! ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावंडांना शॉक, वीजेचा धक्का लागून दोघांचाही मृत्यू

हृदयद्रावक ! ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावंडांना शॉक, वीजेचा धक्का लागून दोघांचाही मृत्यू

हृदयद्रावक ! ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावंडांना शॉक, दोघांचाही मृत्यू

हृदयद्रावक ! ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावंडांना शॉक, दोघांचाही मृत्यू

brother died due to electric shock : शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:
बीड, 20 नोव्हेंबर : ज्वारीला पाणी देण्यासाठी गेल्या दोन सख्या भावाचा विजेचा धक्का लागून मृत्यू (brothers died due to electric shock) झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील (Patoda taluka) नाळवंडी येथे काल घडली आहे. हुसेन फकीरभाई शेख आणि जाफर फकीरभाई शेख असं मयत झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. दिवसा लोडशेडिंग आणि सिंचनासाठी रात्रीच्या वेळी लाईट सोडली जाते. यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतांतील पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने महावितरणवर शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी लाईट असते त्यामुळे शेतात पिकाला पाणी द्यायला गेले असता साप, विंचू आणि हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे दिवसाची लाईट द्या अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. वाचा : शेतीचे काम आवरून 4 जण दुचाकीवरून चालले होते घरी, कारच्या धडकेत सर्वांचा मृत्यू मदतीला धावला भाऊ पण... नाळवंडी येथील हुसेन फकीरभाई शेख आणि जाफर फकीरभाई शेख हे शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले असता शेजारच्या शेताच्या कुंपणाला विद्युत प्रवाह उतरल्याचे कुंपनला हात लागून शॉक बसला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ मदतीला धावला मात्र, यावेळी दोघांचाही करंट लागून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना रान डुकरांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन दरबारी शेतकऱ्यांनी सांगूनही प्रशासन व्यवस्था याकडे दुर्लक्ष करते. यामुळे या भागातील शेतकरी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. वाचा : 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं नेमकं काय घडलं? नाळवंडी येथील रवी ढोले यांनी आपल्या शेतातील पिकांचा रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी तारेचे कुंपण केले त्याला रात्री वीज प्रवाह उतरल्याने रात्री त्यांच्या शेजारचे शेतकरी हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख हे रात्रीची वीज असल्याने रात्री शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी हुसेन फकीरभाई शेख यांचा कुंपणाच्या तारेला हात लागला. त्याचवेळी त्यांचे बंधू जाफर फकीरभाई शेख हे त्यांना सोडवण्यासाठी त्याठिकाणी गेले, मात्र त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या वीजेमुळेच दोन सख्या शेतकरी बांधवांचा जीव गेल्याची संताप व्यक्त केला जात आहे.
Published by:Sunil Desale
First published: