मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कल्याण डोंबिवली पालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक, क्रिप्टो माफियांनी हल्ला केल्याची शक्यता

कल्याण डोंबिवली पालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक, क्रिप्टो माफियांनी हल्ला केल्याची शक्यता


कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे ॲाफिशल ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे ॲाफिशल ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे ॲाफिशल ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India

कल्याण, 15 सप्टेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केडीएमसीच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर क्रिप्टोमधील इथेरियम प्रमोशनचे ट्वीट केले जात आहे. या प्रकारमुळे केडीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे ॲाफिशल ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. केडीएमसीच्या ट्वीटर अकाऊंटचं नाव vitalik.eth असं नाव बदलण्यात आले असून गेल्या 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ झाला सेकंदाला किमान 3-4 ट्विट या अकाऊंटवर केले जात आहेत. इथेरियम ब्लॉक चेनच्या प्रमोशनचे ट्वीट केले जात आहे.

(तुमचं Gmail Account हॅक तर नाही झालं? सोप्या स्टेप्सने असं तपासा, राहाल अलर्ट)

या ट्वीटमध्ये एक लिंकही दिली आहे. इथेरियम ब्लॉकचे मर्ज होणार आहे. त्यामुळे हे प्रमोशन केले जात आहे. या ट्वीटमधील लिंकवर क्लिक करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालिकेकडून तातडीने ट्वीटर अकाऊंट पुन्हा एकदा रिक्व्हर करण्याचे काम सुरू आहे.

Twitter अकाउंट व्हेरिफाय करण्याच्या नादात हॅक होईल फोन

दरम्यान, अलीकडे ट्विटर अकाउंट व्हेरिफाय होण्याचं प्रमाण वाढलंय. अनेक जण इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अकाउंट व्हेरिफाय व्हावं आणि ब्लू टिक मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. पण याच प्रयत्नांचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी नोएडात घडलेल्या एका घटनेने सायबर गुन्हेगारांच्या नव्या युक्त्या उघड झाल्या आहेत. एका महिलेने नोएडा पोलिसांच्या सायबर सेल विंगकडे फ्रॉडची तक्रार केली. तिने ट्विटरवर ब्लू टिकसाठी अप्लाय केलं होतं. काही तासांत ट्विटरने तिचं अकाउंट व्हेरिफाय केलं आणि ब्लू टिक दिली, पण त्यानंतर अचानक तिला मेसेज येऊ लागले. एका व्यक्तीने तिला ट्विटरवर मेसेज करून ट्विटर कंपनीतून असल्याचं सांगितलं.

कोणती खबरदारी घ्यावी

ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रं कुणालाच द्यावी लागत नाही. काही प्रकरणांमध्ये ट्विटर तुमचं ओळखपत्र मागतं, पण ते तुम्हाला स्वतःलाच संबंधित वेबसाईटवर अपलोड करावं लागतं. ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावं लागेल. तिथे Your Account आणि नंतर Account information वर जावं लागेल. तिथे तुम्हाला Verificationचा ऑप्शन दिसेल.

तुमचं अकाउंट व्हेरिफाय नसेल तर तुम्ही तिथूनच अप्लाय करू शकता. त्यासाठी ट्विटरशी तुम्हाला काही माहिती शेअर करावी लागेल, त्याची पडताळणी झाल्यावर तुमचं अकाउंट व्हेरिफाय होईल. त्यामुळे अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, नाहीतर तुम्ही सायबर गुन्हेगारांचे बळी ठराल.

First published: