मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजीव सातवांच्या निधनानं तुकाराम मुंढे हळहळले, म्हणाले...

राजीव सातवांच्या निधनानं तुकाराम मुंढे हळहळले, म्हणाले...

राजीव सातव यांच्या निधनामुळे अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट शेअर करत हळहळ व्यक्त केली आहे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Tweet) यांनीही राजीव सातव यांच्याबाबत ट्विट केलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 16 मे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन (Congress MP Rajiv Satav Passes Away) झालं आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, नंतर सायटोमॅगीलो व्हायरसची लागण झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली. यातच आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट शेअर करत हळहळ व्यक्त केली आहे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Tweet) यांनीही राजीव सातव यांच्याबाबत ट्विट केलं आहे.

राजीव सातव यांच्या मृत्यूचं कारण ठरलेला 'सायटोमेगॅलो व्हायरस' नेमका काय आहे?

मुंढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, युवा नेते राजीव सातव यांचं कोरोनानं निधन. एक आश्वासक लोकनेत्याच्या अकाली निधनानं संपूर्ण देश शोकात आहे.

BREAKING: खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन

याशिवाय संजय राऊत यांनीही भावुक होत सातव यांच्या निधनाबाबत ट्विट केलं आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडिओ कॉलवर आपण निशब्द हाय हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?

First published:

Tags: Corona, Rajiv Satav, Tukaram mundhe