नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 25 मार्च : भंडाऱ्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या नातीला घेऊन जात असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एक्टिव्हा वरील आजोबा आणि नातीला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात आजोबा आणि नातीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा शहर लगत नागपूर नाक्यावर हा अपघात घडला आहे. वाळूची अवैध वाहतूक करत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने शाळेतून घरी जाणाऱ्या एक्टिव्हावरील आजोबा नातीला चिरडलं. ट्रकने एक्टिव्हा गाडीला मागून जबर धडक दिल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन आजोबा-नातीचा मृत्यू झाला आहे.
कवडू बड़वाईक (वय 73) असं मृतक आजोबाचे नाव असून वाणी बड़वाईक (वय 6) असं मृतक नातीचं नाव आहे. कवडू बड़वाईक आपल्या वाणी या चिमुरडीला शाळेतून घेऊन घरी एक्टिव्हा गाडीने जात होते. त्यावेळी नागपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर ट्रकने मागून जबर धडक दिली. (सायरस मिस्त्रींच्या मर्सिडिजचा जिथे झाला अपघात, तिथूनच जवळ ‘फॉर्च्युनर’चा झाला चुराडा, चौघेही बचावले) धडक बसल्यानंतर मोपेड ही ट्रक खाली येऊन कवडू बडवाईक यांचा जागीच मृत्यू झाला तर नात वाणी ही गंभीर जखमी झाली असता तिला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एकच गर्दी नागपूर नाका परिसरात निर्माण होत तणाव निर्माण झाला होता. दरम्यान वेळीच पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करत गर्दीला शांत केलं आहे. आजोबा नातीच्या या अपघाती निधनाने भंडारा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

)







