राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 25 मार्च : ‘दैव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. मात्र याच म्हणीची प्रचिती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरमधील धानिवरी इथं आली आहे. भरधाव फॉर्च्युनर कारने कंटेनरला धडक दिली. पण, कारमधील चारही प्रवाशांनी सीट बेल्ट बांधल्यामुळे चौघांचेही प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या अपघाती मृत्यू ठिकाणाहून काही अंतरावर धानिवरी इथं फॉर्च्युनर गाडीचा हा भीषण अपघात झाला. चालकाच भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ही फॉर्च्युनर कार थेट पुढे चाललेल्या कंटेनरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात फॉर्च्युनर गाडी अर्धी कापली गेली. तसंच या भरधाव कारणे अपघातानंतर तीन ते चार पलटी देखील खाल्ल्या. मात्र या कारमधील कार चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने या कारमधील कुणालाही किरकोळ दुखापत सुद्धा झाली नाही. (समृद्धी महामार्गावर माशांचा पाऊस, लोकांनी पातेलं भरून घरी नेले मासे, VIDEO) विमल मैतालिया हे आपल्या कारचालक आणि मुलांसह मुंबईकडे जात असताना धानीवरी इथं हा भीषण अपघात घडला. मात्र कार मधील सर्वांचा दैव बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही. वाहतुकीचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन पोलीस प्रशासन, आरटीओ आणि शासनाकडून करण्यात येत असते. नियम मोडणाऱ्यांना दंडही लावला जातो. मात्र हेच नियम जर कसोशीने पाळले तर आपला जीव आपण स्वतःही वाचू शकतो हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय दरम्यान, महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ही बाब अतिशय चिंतेची ठरत आहे. गेल्या काही काळापासून शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. अपघातांची संख्या सातत्याने वाढत असल्याने बाब चिंतेची ठरली आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपायोजना आखण्यात आली असून समृद्धी महामार्गावर आठ समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. परिवहन खाते आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत समुपदेशन केंद्र सुरु करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (मुलगा दारात खेळताना अचानक पिसाळलेला कुत्रा आला अन्… घडलं भयानक) अपघातांचा आकडा 900 च्या वर समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडा 900 पेक्षा अधिक आहे, तर समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मागील तीन महिन्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात रोखण्यासाठी नागपूर ते शिर्डी दरम्यान 8 समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. येत्या सात दिवसात ही समुपदेशन केंद्र कार्यन्वित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







