ट्रेकर्सचे मार्गदर्शक अरुण सावंत यांचा दरीत पडल्यानं मृत्यू

ट्रेकर्सचे मार्गदर्शक अरुण सावंत यांचा दरीत पडल्यानं मृत्यू

हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 19 जानेवारी : हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. कोकणकड्यावरील माकडनाळ भागात शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. माकडनाळ भागात सावंत यांच्यासोबत तिघेजण होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

याबाबत मिळालेली माहितीअशी की, अरुण सावंत आणि इतर 30 जणांचा ग्रुप रॅपलिंगसाठी हरिश्चंद्र गडावर आले होते. कोकण कडा ते माकडनाळ इथं ते रॅपलिंग करणार होते. यातील पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्यासोबतचे सर्वजण खाली उतरले. शेवटी असलेले अरूण सावंत दरीत कोसळले.

कोकणकडा जवळपास अठराशे फूट उंच आहे.  कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात असताना फाॅल झाला. त्यानंतर 550 फूट खोल दरीत खडकांवर ते पडले आणि जागेवरच मृत्यू झाला. अरुण सावंत यांचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला आहे.

वाचा : पतंग पकडण्यासाठी धावला आणि थेट विहिरीत पडला, 8 तासांनंतर बाहेर काढला चिमुकल्याचा

ट्रेकर्सना मार्गदर्शन करणारे अरुण सावंत यांचा असा दरीत पडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रेकिंगच्या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव मानलं जातं. गेल्या 25 वर्षांत त्यांनी सह्याद्रीतली कित्येक ठिकाणं आणि वाटा शोधल्या होत्या. ड्युक्स नोज लोणावळाची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक अशीही त्यांची ओळख होती. सह्याद्रीतल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या ट्रेकिंगच्या जागा सांधण व्हॅली , कोकणकडा रॅपलिंग , थिटबी वाॅटरफाॅल रॅपलिंग सारख्या जागा त्यांनी गेल्या ४० वर्षांत शोधल्या. अनेक कड्यांवर आजही अरूण सावंत यांनी केलेल्या बोल्टींगच्या आधारावरच गिर्यारोहक चढाई करतात. अशा मार्गदर्शकाच्या मृत्यूने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

वाचा : शेतकरी कर्जमाफीच्या मेसेजमध्ये 'खेळ'; माहितीऐवजी ओपन होते कँडी क्रश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2020 12:46 PM IST

ताज्या बातम्या