शेतकरी कर्जमाफीच्या मेसेजमध्ये 'खेळ'; माहितीऐवजी ओपन होते कँडी क्रश

शेतकरी कर्जमाफीच्या मेसेजमध्ये 'खेळ'; माहितीऐवजी ओपन होते कँडी क्रश

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या मेसेजवरून आता नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या मेसेजवरून आता नवा गोंधळ निर्माण झाला आहे. योजनीचे माहिती शेतकऱ्यांना किसान पोर्टलवरून दिली जाते. यात पोर्टलवरूनच मोबाईलवर मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये पोर्टलची लिंकही पाठवली जाते. पण त्या लिंकवर क्लिक करताच कँडी क्रश आणि इतर गेम्सच्या साइट ओपन होत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अशा दोन योजना जाहीर केल्या आहेत. अजुनही शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. आता सरकारच्या किसान पोर्टलवरून कर्जमाफीची माहिती देणारा मेसेज पाठवला जात आहे. यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.

VZ-KISSAN या पोर्टलवरून पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये 'महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या माहितीसाठी https://bit.do/mjpsky 2019 या लिंकला भेट द्या असं लिहिलं आहे. मेसेजमध्ये पाठवलेल्या या लिंकवर क्लिक करताच वेगळाच प्रकार घडत आहे. माहिती ओपन होण्याऐवजी गेम सुरू होते. यामध्ये कॅन्डी क्रश, डायमन डायरीज सारख्या गेम सुरू होत असल्याने कर्जमुक्तीचा खेळ केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दुष्काळ आणि अतिवृष्टी, महापूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यातच सरकारने दिलेली मदतही वेळेवर मिळत नसताना अशा प्रकारच्या मेसेजमुळे शेतकरी वर्गात संताप पसरला आहे. अद्याप या मेसेजबाबत सरकार किंवा किसान पोर्टलकडून कोणती माहिती देण्यात आलेली नाही.

शिर्डी बेमुदत बंद, मुख्यमंत्री तोडगा काढत नाहीत तोपर्यंत माघार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 08:55 AM IST

ताज्या बातम्या