मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पतंग पकडण्यासाठी धावला आणि थेट विहिरीत पडला, 8 तासांनंतर बाहेर काढला चिमुकल्याचा मृतदेह

पतंग पकडण्यासाठी धावला आणि थेट विहिरीत पडला, 8 तासांनंतर बाहेर काढला चिमुकल्याचा मृतदेह

शिममधील मंगरुळपीर शहरातील खरेदी विक्री परिसरात असलेल्या उजाड विहीरीत ओम काकरवार याचा तोल गेला होता.

शिममधील मंगरुळपीर शहरातील खरेदी विक्री परिसरात असलेल्या उजाड विहीरीत ओम काकरवार याचा तोल गेला होता.

शिममधील मंगरुळपीर शहरातील खरेदी विक्री परिसरात असलेल्या उजाड विहीरीत ओम काकरवार याचा तोल गेला होता.

  • Published by:  Akshay Shitole
किशोर गोमाशे, वाशिम, 18 जानेवारी : पतंग पकडण्यास गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. ओम रवींद्र काकरवार असं मृत मुलाचे नाव आहे. वाशिममधील मंगरुळपीर शहरातील खरेदी विक्री परिसरात असलेल्या उजाड विहीरीत ओम काकरवार याचा तोल गेला होता. मकरसंक्रांत निमित्त मंगरुळपिर शहरातील खरेदी विक्री परिसरात काही मुले पतंग उडवीत होती. त्यातील ओम काकरवार हा मुलगा पतंग पकडण्यासाठी जात असतांना परिसरातील विहिरीत पडला. विहीर वापरात नसल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्याच गाळात फसून ओम चा दुर्दैवी मृत्यू झाला. मकर संक्रांती निमित्त गावागावात पतंग उडवले जात असून बच्चे कंपनी तो पकडण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न करणाऱ्या मंगरुळपिर शहरातील 10 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक! बसमध्ये चिमुकलीवर विनयभंग करून व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप STATUS वर केला अपलोड तब्बल 8 तास चालली शोध मोहीम मंगरुळपिर शहरातील ओम काकरवार या 10 वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीतून काढण्यात यश आलं आहे. सकाळच्या सुमारास विहिरीत पडलेल्या ओम काकरवार याचा मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल 8 तासांहून अधिक वेळ लागला. दरम्यान, खेळता-खेळता एका चिमुकल्याचा जीव गेल्याने आता प्रत्येक पालकाने आपल्या मुलाची काळजी घेण्याची गरज या दुर्घटनेमुळे निर्माण झाली आहे.
First published:

पुढील बातम्या