दापोली, 21 नोव्हेंबर : उरण-पनवेल मार्गावरील (Uran-Panvel ) जासई गावाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर पुलावरून रेल्वे रुळावर कोसळला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ट्रेलर (trailer) रुळावर कोसळल्यामुळे ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जासई-दापोली मालवाहू महामार्गावर ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. कंटेनर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रेलर ओव्हर ब्रिजवरून थेट खाली रेल्वे रुळावर कोसळला आहे. यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कंटेनरचा चक्काचूर झाला.
Maharashtra| A trailer with container fell from a road over bridge (ROB) in Jasai-Dapoli goods line section on Saturday evening. Driver of the container has succumbed to his injuries. Railway relief trains have reached the spot to restore the services: Central Railway pic.twitter.com/oCUrO6btOy
— ANI (@ANI) November 20, 2021
ट्रेलर पुलावरून खाली कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेच्या मदत गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. मराठमोळ्या तरुणाची कमाल! स्टार्टअपसाठी आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर दरम्यान, याच महिन्यात 2 नोव्हेंबर रोजी उरण -पनवेल मार्गावर ( Uran-Panvel road) पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा (girder collapses) कोसळला होता. या दुर्घटनेमध्ये 5 जण जखमी झाले होते. नवी मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर ही घटना घडली आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घडली. जासाई गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान गर्डर कोसळला.