मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

देशात ऑलिम्पिक चळवळ मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील : नीता अंबानी

देशात ऑलिम्पिक चळवळ मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील : नीता अंबानी

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम (OVAP) ओडिशामध्ये पार पडला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम (OVAP) ओडिशामध्ये पार पडला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम (OVAP) ओडिशामध्ये पार पडला.

मुंबई, 24 मे : आज (24 मे) ओडिशामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम (ओव्हीएपी) पार पडला. आयओसीच्या (IOC) सदस्या नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली. या माध्यमातून युवकांना उत्कृष्टता, आदर आणि मैत्री ही ऑलिम्पिकची मूल्यं शिकायला मिळावीत अशा प्रकारे हा कार्यक्रम डिझाइन केला गेला असल्याचं नीता यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाच्या मदतीने लहान मुलांना अधिक सक्रिय, सुदृढ आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्यास मदत होईल. तसंच, या माध्यमातून भारतात 2023 मध्ये होणाऱ्या IOC च्या (2023 Mumbai Olympics) सेशनपूर्वीच, देशात ऐतिहासिक ऑलिम्पिक चळवळीची उत्साहात सुरुवात झाली आहे, असं नीता अंबानी यावेळी म्हणाल्या.

या ओव्हीएपी (Olympic Values Education Program) अभियानाची अधिकृतरीत्या सुरुवात आजपासून (24 मे 2022) झाली. या वेळी ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik), नीता अंबानी (Neeta Ambani), आयओसी एज्युकेशनल कमिशनचे अध्यक्ष मिकाईला कोजांग्को जॉवर्स्की (Mikaela Cojuangco Jaworski), ऑलिम्पिक खेळाडू आणि आयओसी अ‍ॅथलीट्स कमिशनचे मेंबर अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बात्रा (Narinder Batra) आदी उपस्थित होते. ओव्हीएपी अभियान हे ओडिशाच्या शाळांमधून राबवण्यात येणार आहे. ओडिशा राज्य शिक्षण विभाग, ओडिशा सरकार आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येईल.

तब्बल 40 वर्षांनी भारतात होणार ऑलिम्पिक स्पर्धा

2023 साली IOC च्या सेशनचं यजमानपद कोणत्या देशाला देण्यात यावं याबद्दलच्या बिडिंगमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला नीता अंबानी (IOC Member Mrs Neeta Ambani) यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी आयओसीने तब्बल 40 वर्षांनंतर हे सेशन आयोजित करण्याचे सर्व हक्क भारताला दिले. 2023च्या IOCच्या सेशनच्या यजमानपदाचे हक्क मिळणं हे भारतीय खेळाच्या इतिहासातल्या एका नव्या युगाचं प्रतीक आहे. यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या आशा उंचावल्या आहेत. तसेच, देशात खेळाविषयी नवीन वातावरण तयार होण्यास मदत मिळणार आहे.

ओव्हीएपी कार्यक्रम का महत्त्वाचा?

नीता अंबानी या विविध ऑलिम्पिक कमिशनच्या (Olympic commissions) सदस्य आहेत. यामध्ये ऑलिम्पिक शिक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या ओव्हीएपीचाही (OVAP) समावेश आहे. हे कमिशन त्यांना सर्वाधिक जवळचं वाटतं. कारण या माध्यमातून लहान मुलांमध्ये ऑलिम्पिक मूल्यं रुजवण्याचं काम केलं जातं. “आपल्या देशात 25 कोटींहून अधिक लहान मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये भरपूर प्रतिभा आहे. ही मुलं उद्याची चॅम्पियन आहेत. जगात ऑलिम्पियन बनणारी मुलं अगदी कमी असली, तरी ऑलिम्पियनची मूल्यं मात्र आपण सर्व मुलांना शिकवू शकतो. हेच ओव्हीएपीचं लक्ष्य आहे. यामुळे ही भारतासाठी आणि भारताचं भविष्य असणाऱ्या या सर्व मुलांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे,” असं मत नीता अंबानी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

या वेळी नीता अंबानी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेदेखील आभार मानले. पटनायक यांच्या दूरदृष्टी नजरेमुळे ओडिशा हे भारताच्या क्रीडा महत्त्वाकांक्षेचं केंद्र बनलं आहे, असं त्या म्हणाल्या. ‘ओडिशा रिलायन्स फाउंडेशन अ‍ॅथलेटिक्स हाय-परफॉर्मन्स सेंटर’ हे ओडिशा सरकार आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चालवले जाते. येथील ज्योती याराजी आणि अमलान बोरगोहेन यांनी गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेमध्ये कित्येक रेकॉर्ड्स मोडून पदकं जिंकली आहेत. ज्योतीने आधी 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आणि नंतर स्वतःचाच नवा रेकॉर्ड पुन्हा मोडला. यामुळे तिला राष्ट्रकुल स्पर्धेसाठीदेखील पात्रता वेळ मिळाली आहे. एकूणच, ओडिशा सरकार आणि रिलायन्स फाउंडेशन या दोन सुरक्षित हातांमध्ये देशाच्या खेळाडूंचं भवितव्य आहे असं म्हणण्यास हरकत नाही.

वाचा - मुंबईच्या झोपडपट्टीत राहिलेल्या क्रिकेटरची अर्जुन तेंडुलकरवर मात, भावानं गाजवलाय वर्ल्ड कप

 सध्या ऑलिम्पिक समितीदेखील ओडिशा सरकारसोबत खेळाडूंसाठी काम करत आहे. ओव्हीएपीमार्फत परिस्थिती नसलेल्या किंवा बऱ्याच अडचणींचा सामना करणाऱ्या खेळाडूंना मदत केली जाते. या प्रोग्रामच्या अंतर्गत पहिल्या वर्षात भुवनेश्वर आणि रूरकेला शहरांमधल्या 90 शाळांचा समावेश केला जाणार आहे. या शाळांमधल्या 32,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य सरकारने ठेवलं आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठांमध्ये राबवण्यात येईल. या माध्यमातून सर्व लहान मुलं आणि युवकांना ऑलिम्पिक मूल्यं शिकवण्यात येतील. यासाठी ठराविक मुख्याध्यापक, शिक्षक आणि खेळ प्रशिक्षक व अधिकाऱ्यांसाठी ‘ऑलिम्पिक फाउंडेशन फॉर कल्चर अँड हेरिटेज’मार्फत ‘मास्टर्स ट्रेनर्स’ नावाचा प्रोग्राम राबवण्यात येईल. त्यानंतर या प्रशिक्षित व्यक्ती आठ-दहा शाळांच्या विद्यार्थ्यांचे फोकस ग्रुप तयार करून त्यांना प्रशिक्षण देतील, अशी एकूण योजना आहे.

ओव्हीएपी कार्यक्रम काय आहे?

ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रमाला पूरक अशी ऑलिम्पिक समितीमार्फत तयार करण्यात आलेली विनामूल्य प्रशिक्षण मालिका आहे. ऑलिम्पिकची मुख्य तत्त्वं आणि खेळांचा संदर्भ यांचा वापर करून याचं डिझाइन करण्यात आले आहे. यातल्या सहभागींना एक जबाबदार नागरिक बनण्याच्या दृष्टीने मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं जातं. ओव्हीएपीच्या माध्यमातून खेळ आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीजचे दीर्घकालीन फायदे सांगितले जातात. यासाठी असलेल्या अभ्यासक्रमात ऑलिम्पिजम म्हणजे काय आणि त्याचे वैयक्तिक आरोग्य, आनंद आणि सामाजिक संवादावर काय परिणाम होतात, यांचाही समावेश आहे.

First published:

Tags: Olympic, Reliance