मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अडवलं का? असा जाब विचारत तरुणांकडून पोलिसांना बेदम मारहाण: VIDEO

अडवलं का? असा जाब विचारत तरुणांकडून पोलिसांना बेदम मारहाण: VIDEO

काही ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे.

काही ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे.

काही ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे.

औरंगाबाद, 9 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. शहराशहरात पोलिस ठिकठिकाणी तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. लॉकडाऊनमध्ये अडवल्याने दोन तरुणांनी वाहतूक पोलिसांना काठीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा..SALUTE! मुलासाठी आईनं लॉकडाऊनमध्ये दुचाकीवरुन केला 1400 किमीचा प्रवास

काय आहे प्रकरण?

शहरातील दिल्ली गेटजवळील अण्णाभाऊ साठे चौकात ही संतापजनक घटना घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना नाकाबंदी केली होती. तरी देखील एका दुचाकीवरुन तिघेजण आले. पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. मात्र, थोड्या वेळाने तिघेजण आपल्या इतर मित्रांना घेऊन भाऊ साठे चौकात पोहोचले.

हेही वाचा..COVID-19: पोलिसांची थक्क करणारी कहाणी ऐकून अक्षय कुमार म्हणाला दिलसे थँक्यू!

आम्हाला अडवलंच का? असा जाब विचारत वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. एका तरुणाने एका पोलिसांची काठी हिसकावून त्यालाच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या तरुणांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. यानंतर तरुण तेथून पसार झाले. या मारहाणीत दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा..अजित पवार यांच्या सुचनेनंतर बारामतीत घेतला मोठा निर्णय, मध्यरात्रीनंतर..

दरम्यान, राज्यात कोरोनाचं मोठं संकट आलं आहे. सरकारला लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागला असताना नागरिकांनी घरात बसून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस विभाग दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिकांच्या बेशिस्त वर्तनाला पोलिसांना सामोरे जावे लागत आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: