Home /News /maharashtra /

सिंहगडावरील ई-बस पर्यटकांच्या कामाची नाहीच; पाहा, पुन्हा काय घडलं?

सिंहगडावरील ई-बस पर्यटकांच्या कामाची नाहीच; पाहा, पुन्हा काय घडलं?

पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ई-बस (E Bus) सुविधा अपयशी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना (Tourist on Sinhagad) याचा फटका बसत आहे. ई बसमध्ये चार्जिंग नसल्याने प्रवाशांना खाली उतरावे लागले होते.

  पुणे, 16 मे : पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ई-बस (E Bus) सुविधा अपयशी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना (Tourist on Sinhagad) याचा फटका बसत आहे. ई बसमध्ये चार्जिंग नसल्याने प्रवाशांना खाली उतरावे लागले होते. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. तेच आता आणखी एक घटना समोर आली आहे. परवाच एका ई-बसला अपघात झाला. तर रविवारी पर्यटकांसाठी चार्जिंगच्या बसच उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. रविवार असल्याने सिंहगडावर पर्यटकांची सिंहगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, पर्यटकांना खाली आणण्यासाठी बसच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पर्यटक गडावरच अडकल्याचे पाहायला मिळाले. पर्यटक या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झाले होते. 2 मे पासून ई-बसची सुविधा - सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी तसेच प्रदूषण होऊ नये म्हणून ई-बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वनविभागाने हा निर्णय घेतला होता. यानंतर 2 मेपासून ई-बसची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, या बसला गडावर जाता आणि येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या सर्व गोष्टींचा फटका पर्यटकांना बसत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका बसला अपघात झाला होता. यामुळे पर्यटक चिडले होते. अशा घटनांनतर प्रशासनाने सतर्क होऊन पर्यटकांसाठी योग्य ती व्यवस्था करणे महत्त्वाचे असते. मात्र, असे काहीही झालेले नाही. याचेच एक उदाहरण रविवारी रात्री समोर आले. शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पर्यटकांसाठी ई-बसची सुविधा असणे आवश्यक होते. मात्र, चार्जिंग नसल्याने बस गडावरच उभ्या असल्याचे पाहायला मिळाले. हेही वाचा - ''केतकी चितळेची पवारांविषयीची FB पोस्ट अतिशय...'', सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया
  परवाच एका ई-बसला अपघात झाला. त्यात आता ही घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पर्यटक रात्री 8 वाजेपर्यंतही तिथेच ताटकळले होते. ई-बसचा ढिसाळ कारभार जर होत असेल तर या बस कशासाठी आहेत. त्या बंद केल्या पाहिजेत आणि पुन्हा वाहनांना परवानगी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली आहे. एकूणच सिंहगडावर वनविभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या ई-बसेसचा अगदी बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bus conductor, Electric vehicles, Pune

  पुढील बातम्या