नवी मुंबई, 26 मार्च: स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची आज नवी मुंबईतील कोपर खौरणेमध्ये सभा होणार आहे. या सभेत स्वराज्य संघटना राजकीय रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार इतर राजकीय पक्षासाठी कम करणाऱ्या पण आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या तरणांना स्वराज्य संघटना संधी देणार आहे.
संघटनेची दिशा ठरणार
नवी मुंबईत होणाऱ्या या सभेमध्ये स्वराज्य संघटनेची दिशा ठरवली जाणार आहे. या सभेत छत्रपती संभाजीराजे काही मोठे राजकीय स्फोट करणार असल्याचं देखील बोललं जातं आहे. तसेच ते मोठी घोषणा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे या सभेत संभाजीराजे छत्रपती नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. स्वराज्य संघटना आगामी काळात इतर पक्षात काम करणाऱ्या पण आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या तरुणांना संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात स्वराज्य संघटनेत तरुण वर्ग मोठ्या संख्येनं प्रवेश करण्याची शक्यता आहे.
'बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं', मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला फटकारलं
राजकीय नेत्यांची पोलखोल करणार
दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना विजयाची गुढी उभारेल. ज्याप्रमाणे धाराशीवमध्ये जाऊन मंत्री तानाजी सावंत यांची पोलखोल केली त्याचप्रमाणे इतर राजकीय नेत्यांची आणि मंत्र्यांची देखील स्वराज्य संघटना पोलखोल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.