मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Chandrapur: वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर चवताळला अन्.., Live Video

Chandrapur: वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर चवताळला अन्.., Live Video

वाघाने गाईची शिकार केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जात वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले

वाघाने गाईची शिकार केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जात वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले

वाघाने गाईची शिकार केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जात वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले

  • Published by:  Kiran Pharate

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर 23 डिसेंबर : वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकतंच चंद्रपूरमधूनही अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात एका वाघाने गाईची शिकारी केली (Tiger Attack on Cow). ही घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावत घडली. इरई नदीच्या पात्रात वाघाने गाईवर हल्ला करत तिची शिकार केली.

जेवण नीट न बनवल्याने पतीची सटकली; उच्चशिक्षित पत्नीच्या पाठीला घेतला कडकडून चावा

वाघाने गाईची शिकार केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जात वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले. मात्र, गावकऱ्यांना पाहून वाघ जास्तच चवताळला. वाघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहताच गावकऱ्यांनी याठिकाणाहून पळ काढला. या घटनेनंतर भटाळी गावात वाघाची दहशत पसरली आहे.

याआधीही नोव्हेंबर महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (tadoba andhari tiger reserve) एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला (tiger attack on woman forest ranger) केला होता. या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला होता. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात स्वाती ढुमणे गेल्या होत्या. याचवेळी प्रकल्पाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 मध्ये ही घटना घडली. (Woman forest ranger Swati Dhumane died in tiger attack)

दुचाकीला भीषण अपघात; भाजप पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

तर नोव्हेंबरमधीलच आणखी एका घटनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवर वाघाने (Tiger Attack on Cow) हल्ला केलयाचा व्हिडिओ व्हायरल (Tiger Attack Video Goes Viral) झाला होता. चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर ही घटना घडली होती. या मार्गावरून कारने ताडोबाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाने ही दृश्ये आपल्या कॅमेर्‍यात कैद केलेली. अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत शिकार साधल्याचे व्हिडीओत दिसत होतं. (Tiger attack on cow live video)

First published:

Tags: Shocking video viral, Tiger, Tiger attack