मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दुचाकीला भीषण अपघात; भाजप पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

दुचाकीला भीषण अपघात; भाजप पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Road Accident in Jalna: औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल निवांतसमोर दोन दुचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात (Terrible road accident) झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

जालना, 23 डिसेंबर: औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल निवांतसमोर दोन दुचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात (Terrible road accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला (BJP incumbent died in road accident) आहे. या भयंकर अपघातात गंभीर जखमी (Injured) होऊन ते गतप्राण झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी अवस्थेतील भाजप पदाधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.

संतोष ढगे असं अपघातात मृत (Santosh Dhage death) पावलेल्या 45 वर्षीय भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. मृत ढगे हे भारतीय जनता पक्षाचे जालना तालुका सरचिटणीस (General Secretary of BJP) होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ढगे हे बुधवारी दुपारी जालना बसस्थानकापासून औरंगाबाद चौफुलीकडे जात होते. दरम्यान औरंगाबाद रोडवरील हॉटेल निवांत समोरून जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली आहे.

हेही वाचा-"भाजपचं हिंदुत्व म्हणजे 'चोरबाजार'; देश विकलात पण अयोध्या विकता येणार नाही, कारण

हा अपघात इतका भयंकर होता की, संतोष ढगे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी बदनापूर तालुक्यातील खामगाव येथील दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ढगे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

First published:

Tags: BJP, Road accident