मनमाड, 6 नोव्हेंबर : चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (youth brutally murdered) केल्याची घटना समोर आली आहे. मनमाड रेल्वे स्थानकात (Manmad Railway Station) ही घटना घडली आहे. रेल्वे स्थानकातील प्रवाशांसमोर ही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या युवकाचे नाव शिवम पवार (Shivam Pawar) असे असून त्याला तीन बहिणी आहेत. भाऊबीजेच्या (Bhai dooj) दिवशीच असं घडल्याने संपूर्ण पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर धारदार शस्त्राने 5 ते 6 वार केले. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले.
प्रेम प्रकरणातून ही हत्त्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हत्त्या करण्यात आली तेव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती. संबंधित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. चौकशीनंतर या हत्याकांडामागचे नेमकं कारण काय याचा उलगडा होईल. शिवमला 3 बहिणी असून भाऊबाजीच्या दिवशी भावाची हत्या झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करीत आहे.
हिंगोलीत बहीण-भावावर काळाचा घाला
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवाळीसाठी मामाच्या गावाला जाणाऱ्या बहीण-भावाचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. ऐन भाऊबीजेआधी दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनात मृत बहीण-भावाची मोठी बहीण आणि मामा देखील जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिवाळी सणासाठी मामाच्या गावी जाणार म्हणून तिन्ही भाचे खूश होते. पण टाकळगावहून वसमतकडे जात असताना, टाटा एस मॅजिक पिकअपने दुचाकीला जोरदार धडक मारली आहे. सुसाट वेगाने आलेल्या पिकअपने दुचाकीला धडक देताच दुचाकीवर वरील चौघेही घाली कोसळले. मृत आदर्श आणि कीर्तीही रस्त्यावर दूरवर फेकले गेले.
हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तर मामा राजू खिल्लारे आणि मृतांची मोठी बहीण आरती सुरय्या दोघं गंभीर जखमी झाले. आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Diwali 2021, Murder