जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गडचिरोली : चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक; तिघांचे मृतदेह सापडले

गडचिरोली : चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक; तिघांचे मृतदेह सापडले

गडचिरोली : चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक; तिघांचे मृतदेह सापडले

या घटनेत पेरमिली गावालगत असलेल्या नाल्यावर प्रवासी असलेला ट्रक गेला वाहून गेला आहे. यानंतर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

गडचिरोली 10 जुलै : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील २-३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी छोट्या नाल्यांना पूर आले आहेत. यामुळे नागरिकांना सतर्क राहाण्याचा सल्ला दिला गेला आहे. मात्र, आता गडचिरोलीमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे (Three Died After Truck Swept Away in Water). विठुरायाच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू या घटनेत पेरमिली गावालगत असलेल्या नाल्यावर प्रवासी असलेला ट्रक गेला वाहून गेला आहे. यानंतर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. यात पाच ते सहा प्रवासी प्रवास करत होते. आलापल्ली भामरागड मार्गावर पेरमिली लगत असलेल्या नाल्यावरील पुलावर शनिवारी सकाळपासून पाणी होतं. रात्री पाणी कमी झाल्याने चालकाने ट्रक पाण्यात घातला. मात्र, चालकाचा अंदाज चुकला आणि हा ट्रक पाण्यासोबत वाहून गेला.

जाहिरात

रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अहेरी तालुक्यातील पेरमिली गावालगतच्या नाल्यावरची ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक एसडीआरएफ पथक आणि गाव पातळीवरील नागरिकांकडून शोध मोहीम सुरू आहे. आतापर्यंत यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान या घटनेनंतर नाल्यावर साचलेल्या पाण्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यात दिसतं की हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे, की तिथे रस्ता असल्याचंही दिसत नाही. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाने त्यातून ट्रक दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही दुर्घटना घडली. दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच नाल्यांसह मोठ्या नद्यांनाही पूर आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात