सोलापूर 10 जुलै : राज्यभरातील लाखो भाविक हे दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) पंढरपूरमध्ये जातात. यंदा दोन वर्षांनंतर भाविकांना पुन्हा एकदा आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढपुरला जाण्याची संधी मिळाली. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत अनेक भाविक पंढपुरात दाखल झाले. तर, ज्यांना पायी वारीमध्ये सहभागी होता आलं नाही, ते भाविक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाहनांनी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. मात्र, या मंगलमय वातावरणात आता एक दुःखद बातमी समोर आली आहे.
Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची महापूजा; पाहा Photos
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या एका गाडीला अपघात झाला (Road Accident in Pandharpur). या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत (2 Devotees Died in Road Accident). कर्नाटकातील बेळगावमधील अंनगुळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूरकडे येत होते. मात्र, आज पहाटे कासेगाव फाटा येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्गवाडी डोंगराचा तडा वाढू लागला, परशुराम घाट आणखी 3 दिवस बंद
या अपघातात अभिजीत हुंबरे (वय 28), गीतेश पोकंशेकर (वय 26), राजकवि कृष्णा मधुकर (वय 23) हे भाविक जखमी झाले आहेत. तर राजू संभाजी शिधोळकर (वय 45), परशुराम संभाजी जवरूचे (वय 50) हे भाविक मयत झाले आहेत. हे सर्वजण बेळगावच्या अंनगुळ येथील रहिवासी होते. मृतांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashadhi Ekadashi, Major accident