सातारा, 16 डिसेंबर: सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने अश्लील फोटोज व्हायरल करण्याची धमकी (threat to viral obscene photos) देत, आपल्या वहिनीवरच अत्याचार (brother in law raped sister in law) केला आहे. नराधम आरोपीनं गेल्या काही काळापासून आपल्या वहिनीचे वारंवार लचके तोडले आहेत. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी आरोपी दिराविरोधात बलात्कारासह ब्लॅकमेल आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय पीडित महिला सातारा जिल्ह्यातील एका गावात आपल्या पतीसोबत राहते. तिला एक मुलगा देखील आहे. 3 ऑक्टोबर रोजी पीडित महिलेचा चुलत दीर पीडितेच्या घरी आला होता. यावेळी घरात कोणीही नव्हतं. याचीच संधी साधून आरोपीनं पीडितेला बँकेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. तसेच जवळीक साधून आरोपीनं आपल्या वहिनीवरच बलात्कार केला.
हेही वाचा-डोळ्यात मिरची पूड टाकत लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून BF चा खेळ खल्लास
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेचे नग्नावस्थेतील अनेक फोटो देखील काढले. या प्रकारानंतर आरोपीनं घटनेची वाच्यता केल्यास मुलाला आणि पतीला जीवे मारेल, अशी धमकीही दिली. यामुळे पीडित महिलेनं संबंधित घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. यानंतर आरोपी दिराने संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे.
हेही वाचा-सेक्ससाठी नकार दिल्याने गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीला जिवंतपणीच दिल्या नरक यातना
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं अखेर या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीयांनी बोरगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी दिराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कार, ब्लॅकमेल आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी दिराला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape, Satara