जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील संभाव्य कडक लॉकडाऊनबाबत महापौरांनी घेतली स्पष्ट भूमिका

पुण्यातील संभाव्य कडक लॉकडाऊनबाबत महापौरांनी घेतली स्पष्ट भूमिका

पुण्यातील संभाव्य कडक लॉकडाऊनबाबत महापौरांनी घेतली स्पष्ट भूमिका

स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरात लॉकडाऊन (Pune Lockdown) करण्याबाबतचे संकेत दिले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 23 मार्च : राज्यभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक होताना दिसत आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यातच स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरात लॉकडाऊन (Pune Lockdown) करण्याबाबतचे संकेत दिले. मात्र आरोग्यमंत्र्यांच्या या भूमिकेवरून आता महापौर विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झालं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील संभाव्य कडक लॉकडाऊनला विरोध केला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. याबाबत प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे की, ‘सद्यस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येऊ नये. हवं तर निर्बंध आणखी कडक करा, पण लॉकडाऊनचा निर्णय घेऊ नका,’ अशी विनंती महापौरांनी केली आहे. लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने कोणते आदेश दिले? कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना Test-Track-Treat protocol वर जास्तीत जास्त भर देण्यास सांगितलं आहे. कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ट्रॅक करणं आणि सर्वांना लवकरात लवकर उपचार पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा - Pune News: पुणेकरांवर कोरोनाचा भीषण परिणाम; 22 टक्के लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नही घटलं कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना नियमांची कठोरात कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही जिल्हा, पोलीस आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी असेल. 1 एप्रिल, 2021 पासून नवे नियम लागू होणार आहेत. 30 एप्रिल, 2021 पर्यंत त्यांची अंमलबजावणी करणं बंधनकारक असेल, असंही केंद्राने सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात