मीरा भाईंदर, 26 जानेवारी : आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आज पुन्हा एकदा चर्चेत आले. ‘हे कायद्याचे राज्य आहे, हिटलरशाही नाही’ असं म्हणत आव्हाड यांनी मिरा भाईंदर महापालिका उपायुक्तांना (Municipal Deputy Commissioner swapnil sawant) फोनवरच झापून काढले. त्यांचा आक्रमकपणा पाहून अधिकारी वर्गात चांगलेच धाबे दणाणले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज मिरा-भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना फोन करून चांगलेच धारेवर धरले. काशिमिरा परिसरातील आरक्षण क्रमांक 364 मध्ये झालेल्या झोपड्यांवर कारवाई संदर्भात सदर परिसरातील नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तक्रार केली होती. असता तात्काळ पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत यांना फोन करून पुनर्वसन न करता कारवाई कशी केली, अशी विचारणा आव्हाड यांनी केली. ( हार्दिकने तर कहरच केला, ‘पुष्पा’ आजीसोबत श्रीवल्ली डान्स, भन्नाट Video Viral ) तसंच, ‘हे राज्य कायद्याचे आहे हिटलरशाही नाही चालणार नाही. मीरा-भाईंदरचे आयुक्त अधिकारी हे घरी जाऊन सह्या करतात, असं म्हणत आव्हाडांनी कार्यकर्त्यांसमोरच उपायु्क्तांना झापून काढले. दरम्यान, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेसला अल्टिमेटम दिला असून गणेश नाईक यांनी पक्षाशी गद्दारी केल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ( Golden Chance! उमेदवारांनो, BEL कंपनीत नोकरीची ही संधी सोडू नका; इथे करा अप्लाय ) यावेळी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी सर्व झालं गेलं विसरून पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचे आवाहनही जितेंद्र आव्हाड केले आहे. आव्हाडांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.