Home /News /sport /

हार्दिकने तर कहरच केला, 'पुष्पा' आजीसोबत श्रीवल्ली डान्स, भन्नाट Video Viral

हार्दिकने तर कहरच केला, 'पुष्पा' आजीसोबत श्रीवल्ली डान्स, भन्नाट Video Viral

अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचा (Pushpa) फिवर क्रिकेटपटूंनाही चढला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी पुष्पा चित्रपटाच्या डायलॉग आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले आहेत. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) तर त्याच्या आजीसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 जानेवारी : अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचा (Pushpa) फिवर क्रिकेटपटूंनाही चढला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी पुष्पा चित्रपटाच्या डायलॉग आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले आहेत. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) तर त्याच्या आजीसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याच्या आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर डान्स करत आहे. आमची स्वत:ची पुष्पा आजी, असं कॅप्शन हार्दिकने या व्हि़डिओला दिलं आहे. हार्दिक पांड्याच्या आधी डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना आणि ड्वॅन ब्राव्हो या क्रिकेटपटूंनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पुष्पा चित्रपटाच्या गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडिओ शेयर केले. वॉर्नरने अल्लु अर्जुनच्या लूकमधला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला, यात त्याने फेस स्वॅपच्या मदतीने आपला चेहरा बदलला आणि अल्लु अर्जुनचा चेहरा लावला.
  हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात हार्दिक पांड्या अहमदाबादच्या नव्या टीमकडून खेळणार आहे. अहमदाबादच्या टीमने हार्दिकला 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. तसंच त्याला अहमदाबादच्या टीमचं कर्णधारपदही देण्यात आलं आहे. हार्दिकशिवाय अहमदाबादने अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानला 15 कोटी रुपयांना आणि शुभमन गिलला 8 कोटी रुपयांना विकत घेतलं. वॉर्नर ते ब्राव्हो, या खेळाडूंना चढला 'पुष्पा फिवर', शेयर केले Dance Video हार्दिक पांड्या 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून अखेरचा खेळला. फिटनेस आणि खराब कामगिरीमुळे हार्दिक टीमच्या बाहेर गेला. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर मागच्या दोन वर्षांमध्ये हार्दिकने फार बॉलिंग केलेली नाही. हार्दिकच्या या फिटनेसच्या समस्येमुळे मुंबई इंडियन्सनीही त्याला रिटेन केलं नाही.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Hardik pandya

  पुढील बातम्या