उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! जळगाव- भुसावळ रेल्वे प्रवास होणार सुखाचा

उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! जळगाव- भुसावळ रेल्वे प्रवास होणार सुखाचा

आता मुंबईकडे (Trains for Mumbai) जाणाऱ्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना वेळेत प्रवास पूर्ण करता येणार आहे.

  • Share this:

जळगाव (महाराष्ट्र), 16 जून : जळगावहून (Jalgaon) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे . बहुप्रतीक्षित जळगाव आणि भुसावळ दरम्यान असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या (railway route) रेल्वे लाईनचं एकं आता पूर्ण झालं आहे. या लाईनचं कमीशन ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) ही पूर्ण करण्यात आलं आहे. या लाईनला आता मंजुरी देण्यात आली आहे.  त्यामुळे आता मुंबईकडे (Trains for Mumbai) जाणाऱ्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना वेळेत प्रवास पूर्ण करता येणार आहे.

उधना (Udhana) ते जळगाव (Jalgaon) दरम्यान 360 किलोमीटरच्या मार्गाचं डबलिंग पूर्ण झालं आहे, त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आहे, तरीही सुरतकडे (Surat city) जाणार्‍या ताप्ती मार्गाच्या गाड्या उशिरा येत होत्या. मात्र  ही समस्या आता संपणार आहे. जळगाव आणि भुसावळ (Bhusawal) दरम्यान असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनचं काम आता पूर्ण झालं आहे. यातून सुरतकडे येणा तब्बल 40 गाड्यांना जळगावहून वेगळा मार्ग मिळणार आहे.

भुसावळ-जळगाव दरम्यान 35 किमीच्या तिसरा-चौथा मार्ग सुरू केल्यामुळे नाशिक-मुंबई (Nashik-Mumbai trains) मार्गावर आणि ताप्ती मार्गावरील गाड्यांना वेगळा मार्ग मिळाला आहे. आता उधना-पालधी मेमू जळगाव किंवा भुसावळपर्यंत आणण्याची योजना आहे. अमरावती (Amravati) आणि खानदेश एक्सप्रेस देखील नियमित करण्याचं नियोजन आहे.

हे वाचा - पती, सासू गळा दाबून पाजत होते विष, 5 वर्षाच्या मुलीने धाडस दाखवत केलं हे काम

तसंच पश्चिम रेल्वेकडून तीन गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 09175 मुंबई सेंट्रल-भागलपुर स्पेशल आता 13 जून, 09176 भागलपुर-मुंबई सेंट्रल स्पेशल 15 जून, 09177 मुंबई सेंट्रल-भागलपुर स्पेशल 16 जून, 09178 भागलपुर-मुंबई सेंट्रल स्पेशल 19 जून, 09181 बांद्रा टर्मिनस-दानापुर स्पेशल, 15 जून आणि 09182 दानापुर-वडोदरा स्पेशल आता 17 जून या तारखांनाही असणार आहेत.

या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीये. तसंच तासंतास रेल्वे थांबण्याऐवजी प्रवास लवकरात लवकर आणि सुरळीत होणार आहे.

Published by: Atharva Mahankal
First published: June 16, 2021, 10:25 PM IST

ताज्या बातम्या