मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक..! पती आणि सासू गळा दाबून पाजत होते विष, 5 वर्षाच्या मुलीने दाखवलं धाडस आणि केलं हे काम

धक्कादायक..! पती आणि सासू गळा दाबून पाजत होते विष, 5 वर्षाच्या मुलीने दाखवलं धाडस आणि केलं हे काम

आईची गंभीर अवस्था पाहून तिच्या 5 वर्षांच्या मुलीनं 100 नंबरवर कॉल केला. थोड्या वेळाने वैद्यकीय पथक आले मात्र, त्यांना आत येऊ दिले गेलं नाही.

आईची गंभीर अवस्था पाहून तिच्या 5 वर्षांच्या मुलीनं 100 नंबरवर कॉल केला. थोड्या वेळाने वैद्यकीय पथक आले मात्र, त्यांना आत येऊ दिले गेलं नाही.

आईची गंभीर अवस्था पाहून तिच्या 5 वर्षांच्या मुलीनं 100 नंबरवर कॉल केला. थोड्या वेळाने वैद्यकीय पथक आले मात्र, त्यांना आत येऊ दिले गेलं नाही.

  • Published by:  News18 Desk

उदयपूर, 16 जून : घरगुती हिंसाचाराच्या (Domestic violence case) प्रकरणात महिलेला विष पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा हे प्रकरण समोर आले. पोलिसांना 100 नंबरवर कॉल केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी महिलेला एमबी रुग्णालयात नेलं. तेथे उपचार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित जखमी निशाचा जबाब घेतला. पोलीस ठाणे अधिकारी सुनील टेलर यांनी सांगितलं, की पीडिता निशाच्या जबाबाच्या आधारे तिचा पती नरेंद्र अंबालाल सांवरिया आणि त्याची आई शांता सांवरिया यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील प्राथमिक तपासानंतर पती नरेंद्र आणि आई शांता यांना अटक केली जाईल, असे अंबामाता पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी निशाचा भाऊ उदयलाल अंबालाल खटीक, रा. अंबामाता यादव कॉलनी यांनी तक्रार दिली. या वृत्तानुसार, निशाचे सुमारे 7 वर्षांपूर्वी नरेंद्र सांवरियाशी लग्न झाले होते आणि त्यांना एक 5 वर्षाची मुलगी द्रिशा आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीने निशाला मारहाण करण्यास सुुरुवात केली. याच्याविरोधात महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुटुंब आणि समाज यांच्यात बोलणी झाल्यानंतर समझोता झाला होता. राजस्थानातील उदयपूरमधील अंबामाता पोलीस ठाणे परिसरातील मल्लातालाई अमर नगरमधील हा सर्व प्रकार घडला.

सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अंबामाता पोलीस ठाण्याचे हवालदार ओमारम यांना फोन आला होता. ते म्हणाले की, निशाला तिच्या सासरचे लोक घरातून रुग्णालयात घेऊन जात होते. रुग्णालयात पोहोचलो तेव्हा निशा बेशुद्धावस्थेत होती. निशाला याविषयी विचारले असता तिने सांगितले की, रात्री सासू आणि पतीने तिला मारहाण केली. नंतर तिचा गळा दाबला आणि तोंडात काहीतरी ओतले. जेव्हा तिची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली तेव्हा तिला आपल्याला विष पाजले गेल्याचे लक्षात आले. तिची गंभीर अवस्था पाहून तिच्या 5 वर्षांच्या मुलीनं 100 नंबरवर कॉल केला. थोड्या वेळाने वैद्यकीय पथक आले मात्र, त्यांना आत येऊ दिले गेले नाही. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्यांना दवाखान्यात नेले, असे निशाने जबाबात सांगितले.

हे वाचा - भरमंडपात दीराने नवरीसमोर केलं असं काही, थांबवावी लागली सप्तपदी; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वी निशाच्या नणंदेच्या नवऱ्याने नशेत तिचा विनयभंग केल्याची तक्रार निशाने आपल्या पतीकडे केल्याचेही मुलगी द्रिशा हिनं सांगितले. यावर मुलीला घाबरवण्यात आणि धमकी देण्यात आली. यानंतर निशालाही मारहाण करून विष पाजल्याची घटना घडली.

First published:

Tags: Crime news, Rajasthan