नांदेड 21 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हदगांव येथील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. यानंतर सगळ्यात आधी चोरांनी स्वयंपाकघरात जात तिथे ठेवलेल्या जवळपास 20 मोबाईलवर डल्ला मारला. हे मोबाईल अपंग आणि दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासाठी आमदार माधवराव पाटील यांनी आणले होते.
'त्यांनी 1 मारला, आपण 5 मारले आणि अजूनही..'; मॉब लिंचिंगवर भाजपच्या माजी MLA चं खळबळजनक विधान, Video
समोर आलेल्या माहितीनुसार घरात कोणीही नसल्याचं पाहून चोरट्यांनी याठिकाणी डल्ला मारला. स्वयंपाकघरातील मोबाईल चोरल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममध्ये जात तिथेही चाचपणी केली. मात्र तिथे काहीही मिळालं नाही. आमदाराच्या घरातून अंदाजे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आमदारांच्याच घरात चोरी झाल्यावे हदगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान माधवराव पाटील यांच्या राजकीय घडामोडींबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेसचे 11 आमदार सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या 11 आमदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. या आमदारांमध्ये आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या नावाचाही समावेश आहे.
Raigad Boat : हरिहरेश्वर इथं सापडलेल्या बोटीतील फ्रीजमध्ये...., निलेश राणेंचा खळबळजनक दावा
आता मात्र महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये जावू शकतात. या भीतीने काँग्रेस हायकमांडने त्या 11 आमदारांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे 11 आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस निरीक्षक मोहन प्रकाश यांनी केली होती. पण आता कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.