मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ulhasnagar: भिंतीला भगदाड पाडून चोरी, ज्वेलर्समधून लाखोंचे सोने लंपास

Ulhasnagar: भिंतीला भगदाड पाडून चोरी, ज्वेलर्समधून लाखोंचे सोने लंपास

उल्हासनगरात भिंतीला भगदाड पाडून चोरी, ज्वेलर्समधून लाखोंचे सोने लंपास

उल्हासनगरात भिंतीला भगदाड पाडून चोरी, ज्वेलर्समधून लाखोंचे सोने लंपास

Thieves drill hole in wall of jewelry shop and looted: भिंतीला भगदाड पाडून ज्वेलरी शॉपमधील सोने लंपास करण्यात आले आहे.

उल्हासनगर, 23 नोव्हेंबर : उल्हासनगर शहरात चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडत (Ulhasnagar) शिवशक्ती ज्वेलर्समध्ये चोरी (theft in jewelers) केली आहे. ज्वेलर्सच्या मागच्या भिंतीला हे भगदाड पाडून दरोडेखोरांनी तब्बल चार लाख रुपयांचे सोने चांदी लुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दरोड्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक, गोल मैदान परिसरात शिवशक्ती ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला अंबिका हार्डवेअर चे गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये शिरून दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडले आणि आता शिरून चार लाखांचे सोने, चांदी लुटून पसार झाले. (Thieves drill hole in wall of jewelry shop and looted gold ornaments in ulhasnagar)

CCTV नसल्याने पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचं आव्हान

दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर ज्वेलर्स मालकाला दरोडा पडल्याचे समजले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महत्वाचे म्हणजे या ज्वेलर्सच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या दरोडेखोरांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

दुकानात सीसीटीव्ही का बसवले नाही, असे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दुकान मालकाला विचारले असता दुकानाचे नूतनीकरण करायचे होते, त्यामुळे दुकानात सीसीटीव्ही बसवता आले नाही, अशी माहिती दुकानदार नारायण रावल यांनी दिली.

वाचा : गोळीबार करुन पैशांनी भरलेली बॅग पळवली, अहमदनगरमधील घटना CCTV मध्ये कैद

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या तीन टीम

दरम्यान पोलिसांनी तीन पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. रविवारी रात्री नऊ नंतर दुकान बंद केले, मात्र त्यानंतर सोमवारी पुन्हा सकाळी अकरा वाजता दुकान उघडल्यावर दुकानात चोरी झाल्याचे आम्हाला कळाले. यामध्ये दरोडेखोरांनी भिंतीला भगदाड पाडले होते आणि सोने आणि चांदीचे दागिने त्याच बरोबर ग्राहकांच्या सोन्याच्या ऑर्डर होत्या, त्यादेखील चोरून नेल्याचं दुकानदाराचे भाऊ नारायण रावल यांनी सांगितले.

या ज्वेलर्सचे मालक गावी गेल्याने त्यांचा भाऊ गेल्या काही दिवसांपासून हे दुकान सांभाळत होता, त्यामुळे ते गावावरून आल्या नंतर नक्की या ज्वेलर्सच्या दुकानातून किती लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरला आहे हे स्पष्ट होणार आहे.

सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा VIDEO

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निर्घृण हत्या केली आहे. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोन दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

First published:

Tags: Crime, Jewellery shop, Ulhasnagar