जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana robbery CCTV: सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा VIDEO

Buldhana robbery CCTV: सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा VIDEO

सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO

सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO

Buldhana robbery and murder CCTV:बुलढाण्यात एका दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली असून दुकान मालकाची दरोडेखोरांनी निर्घृण हत्या केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 17 नोव्हेंबर : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या चिखली (Chikhali) शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निर्घृण हत्या (shopkeeper murder) केली आहे. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर काल रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोन दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Buldhana Shop keeper murder by robber, incident caught in cctv) चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट हे रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाचे मुख्य शटर बंद करून आतमध्ये थांबले होते. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरताच त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला केला. या झटापटीत ते दरोडेखोर रोख रक्कम लुटून फरार झाले. कमलेश पोपट यांनी जखमी अवस्थेत आपल्या मोबाइल फोनद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यानंतर लगेचच कमलेश पोपट यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात देण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तातडीने पोलीस तपास सुरू केला आहे. वाचा :  गोळीबार करुन पैशांनी भरलेली बॅग पळवली, अहमदनगरमधील घटना CCTV मध्ये कैद मागील काही दिवसात बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. घाटावरचा प्रभार खामगावचे एडिशनल एसपी श्रवण दत्त यांच्याकडे असताना मागील दहा दिवसापासून घाटा खाली भागाप्रमाणे घाटावर सुद्धा अवैध व्यवसायिकांनी आपली दुकाने गुंडाळून ठेवली होती. परंतु कालपासून सर्व अवैध धंदे पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. उधार न दिल्याने संतप्त ग्राहकाची पिंपरीतील बेकरीत तोडफोड उधार न दिल्याच्या रागातून एका ग्राहकाने बेकरीची तोडफोड केल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. पिंपरी - चिंचवड येथील काळेवाडी परिसरात असलेल्या न्यू रॉयल बेकरी नावाच्या दुकानात ही तोडफोडीची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तीन ते चार जण ग्राहक म्हणून या न्यू रॉयल बेकरीमध्ये खाण्यापिण्याचे सामान घेण्यासाठी आले होते, पण नंतर या ग्राहकांनी बेकरी मालकाकडे खाण्या-पिण्याचे पदार्थ उधार देण्याचा तगादा लावला. बेकरी मालकाने ते सामान उधार देणार नाही असे ठाम पणे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून दुकानात ग्राहक म्हणून दाखल झालेल्यांनी बेकरीत तोडफोड केली. यासोबतच दुकानदाराला ही मारहाण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात