Home /News /maharashtra /

बाप रे..! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

बाप रे..! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 400 च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दुसरीकडे चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.

जालना, 23 जून: जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 400 च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दुसरीकडे चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे पावणे सात लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा..धक्कादायक! मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता मिळालेली माहिती अशी की, सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काद्राबाद परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे या महिलेसह तिच्या कुटुंबीयांना इन्स्टिट्युशनल क्वारांटाईन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर महिलेचं घर सील करण्यात आलं होतं. मात्र, चोरट्यांनी कंटेंटमेंट झोनमध्ये असलेल्या या घरालाच डल्ला मारला आहे. घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख 72 हजार रुपयांसह सुमारे पावणे सात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हेही वाचा..रामदेव बाबांनी कोरोनावर आणलं पहिलं औषध, त्यावर काय म्हणाले अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यानं रात्री चोरी केली. घरफोडी करून चोरी झाल्याची बाब सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं हा भाग सील करण्यात आला आहे. तरीही चोरट्यांनी या घरात चोरी करण्याचं धाडस केलं. कंटेंटमेंट झोनमधील कोरोना पॉझिटिव्ह आणि इन्स्टिट्युशनल क्वारांटाईन असलेल्या रुग्णाच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या चोरटयांचा पोलिस शोध घेत आहेत.
First published:

Tags: Jalna, Jalna Crime, Maharashtra news

पुढील बातम्या