Home /News /national /

'कोरोनिल'ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेवांनी केले स्पष्ट

'कोरोनिल'ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेवांनी केले स्पष्ट

यात 69 टक्के रुग्ण हे फक्त 3 दिवसांमध्ये बरे झाले आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित होते, त्याचे रिपोर्ट हे 3 दिवसांनी निगेटिव्ह आले आहे.

    हरिद्वार, 23 जून : पतंजली रिसर्च सेंटरकडून कोरोना मात करण्यासाठी कोरोनिल औषध लाँच करण्यात आले आहे. कोरोनिल औषधामुळे 3 दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण बरं होईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.  पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही बाबा रामदेव यांनी केली. हरिद्वारमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोनिल औषध लाँच करण्यात आली आहे. कोरोनिल औषध हे सात दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे. पतंजलीच्या देशभरातील स्टोअर्समध्ये हे औषध पुढील सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसंच हे औषध सर्व लोकांना मिळावे यासाठी एक अ‍ॅप लाँच करण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही घरपोच डिलिव्हरी मिळवू शकता. यात तीन दिवसांमध्ये औषधाची डिलिव्हरी होणार असा दावा करण्यात आला आहे. असे तयार झाले औषध पतंजलीने स्पष्ट केले की,कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे  मिश्रण आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या औषधाचे दररोज सेवन करावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. अशी होती उपचाराची पद्धत कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकारे उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे  क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं. क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर क्लिनिकल कंट्रोल ट्राय चा वापर केला. यामध्ये पंतजली रिसर्ज सेंटर आणि नॅशनल मेडिकल इन्स्टिट्युट सायन्स निम्स यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 लोकांवर उपचार करण्यात आले. यात 95 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यात 69 टक्के रुग्ण हे फक्त 3 दिवसांमध्ये बरे झाले आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित होते, त्याचे रिपोर्ट हे 3 दिवसांनी निगेटिव्ह आले आहे. एवढेच नाहीतर सात दिवसांमध्ये रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करण्यासाठी सीटीआरची परवानगी घेण्यात आली होती. यामध्ये ज्या रुग्णांना कोरोनिल देण्यात आले नव्हते. त्यांच्यामध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. यामध्ये शंभर टक्के प्रकृती सुधारण्याचा दर असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. 280 रुग्णांवर केला प्रयोग हर्बल औषधाचे नाव हे कोरोनिल असणार आहे. हे औषध आयुर्वैदिक साधनापासून तयार करण्यात आले आहे. या औषधाचे सेवन केल्यानंतर 4 ते 5 दिवसात फरक पाहण्यास मिळणार आहे. पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून  280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. यात सात दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण हे बरे झाले होते. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली. संपादन - सचिन साळवे
    First published:

    पुढील बातम्या