जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण

मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. याचा मध्य प्रदेशातील जनतेला किती फायदा झाला, हे या फोटोंवरून समजू शकतं. तसं पाहिलं तर, मध्य प्रदेशला पाहिजे तसा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशातील अलीराजपूरचे लोक गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील देवहत गावातून पेट्रोल आणि डिझेल भरत आहेत.

01
News18 Lokmat

अलीराजपूरमध्ये दर कमी झाल्यानंतर पेट्रोल 110.51 रुपये आणि डिझेल 95.62 रुपये आहे. तर गुजरातमध्ये पेट्रोल 97.42 रुपये आणि डिझेल 93.10 रुपये आहे. म्हणजेच, पेट्रोलमध्ये 13 रुपये आणि डिझेलमध्ये 2 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे अलीराजपूर जिल्ह्यातून गुजरातकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच वाहनांना तेथूनच पेट्रोल भरलं जात आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

गुजरातमधील पेट्रोल पंपावर मध्य प्रदेशातील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, हे या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. काही लोक ड्रममध्ये भरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणत आहेत. गुजरातमधील पेट्रोल पंपावरील किमतीत मोठी तफावत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मध्य प्रदेश सरकारनेही व्हॅट कर कमी केला तर ते तिथे पेट्रोल-डिझेल भरतील, असं ते म्हणाले.

जाहिरात
03
News18 Lokmat

विशेष म्हणजे केंद्र सरकारने अबकारी करात (excise duty) कपात केल्यानंतर मध्य प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. रविवारी राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलचा दर 108.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.90 रुपये प्रति लिटरवर पोहोचला. तसंच, इंदूरमध्ये पेट्रोल 108.68 रुपये, डिझेल 93.96 रुपयांवर पोहोचलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

ग्वाल्हेरमध्ये पेट्रोल 108.54 रुपये, डिझेल 93.80 रुपये, पेट्रोल 108.26 रुपये, सागरमध्ये डिझेल 93.54 रुपये आणि रतलाममध्ये 108.43 रुपये आणि डिझेल 93.72 रुपयांवर पोहोचले आहे. जबलपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 108 रुपये आणि डिझेलचा दर 93 रुपयांवर आला आहे. येथे तब्बल 47 दिवसांनंतर महागाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होताहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर बाबी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण

    अलीराजपूरमध्ये दर कमी झाल्यानंतर पेट्रोल 110.51 रुपये आणि डिझेल 95.62 रुपये आहे. तर गुजरातमध्ये पेट्रोल 97.42 रुपये आणि डिझेल 93.10 रुपये आहे. म्हणजेच, पेट्रोलमध्ये 13 रुपये आणि डिझेलमध्ये 2 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे अलीराजपूर जिल्ह्यातून गुजरातकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच वाहनांना तेथूनच पेट्रोल भरलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण

    गुजरातमधील पेट्रोल पंपावर मध्य प्रदेशातील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, हे या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. काही लोक ड्रममध्ये भरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणत आहेत. गुजरातमधील पेट्रोल पंपावरील किमतीत मोठी तफावत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मध्य प्रदेश सरकारनेही व्हॅट कर कमी केला तर ते तिथे पेट्रोल-डिझेल भरतील, असं ते म्हणाले.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण

    विशेष म्हणजे केंद्र सरकारने अबकारी करात (excise duty) कपात केल्यानंतर मध्य प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. रविवारी राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलचा दर 108.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.90 रुपये प्रति लिटरवर पोहोचला. तसंच, इंदूरमध्ये पेट्रोल 108.68 रुपये, डिझेल 93.96 रुपयांवर पोहोचलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण

    ग्वाल्हेरमध्ये पेट्रोल 108.54 रुपये, डिझेल 93.80 रुपये, पेट्रोल 108.26 रुपये, सागरमध्ये डिझेल 93.54 रुपये आणि रतलाममध्ये 108.43 रुपये आणि डिझेल 93.72 रुपयांवर पोहोचले आहे. जबलपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 108 रुपये आणि डिझेलचा दर 93 रुपयांवर आला आहे. येथे तब्बल 47 दिवसांनंतर महागाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05