गटारात पडलेल्या भाज्या विकत होता विक्रेता, किळसवाणा VIDEO व्हायरल

गटारात पडलेल्या भाज्या विकत होता विक्रेता, किळसवाणा VIDEO व्हायरल

भिवंडीमध्ये एका भाजी विक्रेत्याने गटारात पडलेला भाजीपाला पुन्हा काढून तो विक्रीसाठी घेऊन जात होता.

  • Share this:

भिवंडी, 28 फेब्रुवारी : ताजा आणि हिरव्या भाज्या खाव्यात असा सल्ला नेहमी डॉक्टर देत असतात. पण, जर तुमच्या हिरव्यागार भाज्या जर गटाराच्या पाण्याने धुवून काढल्या असेल तर? हे ऐकून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. पण, असा किळसवाणा प्रकार भिवंडीमध्ये घडला आहे.

भिवंडीमध्ये एका भाजी विक्रेत्याने गटारात पडलेला भाजीपाला पुन्हा काढून तो विक्रीसाठी घेऊन जात होता. त्याच दरम्यान, काही  नागरिकांनी त्याने केलेल्या  किळसवाणा प्रकाराचे मोबाईल कॅमेऱ्याच्या चित्रीकरण केलं. तो  व्हिडीओ व्हायरल केल्याने ही  घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील गायत्रीनगरात घडली आहे.

भिवंडीतील गायत्रीनगर परिसरात आज दुपारच्या सुमारास हातगाडीवर  भाजीपाला  विक्रीसाठी घेऊन तो विक्रेता रस्त्यावरून जात होता. मात्र, रस्त्याच्या मधोमध  झाकण नसलेल्या गटारात त्या विक्रेत्याची हातगाडी अचानक  कलंडली होती. त्यामुळे हातगाडीवरील भाजीपाला सरळ सांडपाण्याच्या गटारात गेला. तरीही त्याने सांडपाण्याच्या गटारातून भाजीपाला काढून तो विक्रीसाठी घेऊन जात होता. त्याच वेळी काही नागरिकांनी या किळसवाणा प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं.

काही वेळातच हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकांच्या मोबाईलवर आला. त्यांनी हा प्रकार पाहताच त्या भाजीपाला विक्रेत्याला गाठत त्याने गटारातून काढलेला भाजीपाला नागरिकांनी कचराकुंडीत फेकून दिला. मात्र, याघटनेमुळे त्याच्याकडून ही भाजी विकत घेऊन खाणाऱ्याच्या आरोग्यावरील परिणाम टळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Feb 28, 2020 09:42 PM IST

ताज्या बातम्या