मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

घातपाताचा डाव उधळला, 18 लाखांचे बक्षीस असलेल्या 4 जहाल माओवाद्यांना अटक

घातपाताचा डाव उधळला, 18 लाखांचे बक्षीस असलेल्या 4 जहाल माओवाद्यांना अटक

 माओवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून हिंसक कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनिय माहिती पोलीस दलाला मिळाली होती

माओवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून हिंसक कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनिय माहिती पोलीस दलाला मिळाली होती

माओवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून हिंसक कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनिय माहिती पोलीस दलाला मिळाली होती

गडचिरोली, 21 एप्रिल :  माओवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या  धोडराज हद्दीत  मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मौजा नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना 4 जहाल माओवाद्यांना (Maoist arrest) अटक करण्यात गडचिरोली पोलीस (gadchiroli police) दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून हिंसक कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनिय माहिती पोलीस दलाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियाना दरम्यान ०४ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात यश आले.अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्यामध्ये बापू ऊर्फ रामजी दोघे बडे, मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे, सुमन ऊफ जन्नी कोमटी कुड्यामी  आणि अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

(मोठी बातमी, राज्यावर लोडशेडिंगचे संकट अटळ, मुख्यमंत्र्यांनीही दिले स्पष्ट संकेत)

जहाल नक्षली बापु वड्डे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खूनामध्ये याचा सक्रीय सहभाग होता. तसंच त्यांविरोधात ७ खून, ३ चकमक, १ जाळपोळ, २ दरोडा, असे एकूण १३ गुन्ह्यांमध्ये समावेश आहे.

मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो माओवाद्यांच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्याचावर एकूण ०३ चकमकीच्या गुन्ह्यामध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिचा ०३ खून व ०८ चकमक अशा एकूण ११ गुन्हयामध्ये समावेश आहे.

('काळ आला होता, पण वेळ नाही', धनंजय मुंडेंना अश्रू अनावर)

माओवाद्याच्या कारवाया माओवादी विचार प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने  बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर ८ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. तर मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु याच्यावर ६ लाखांचे, सुमन ऊफ जन्नी कोमटी कुड्यामी हिच्यावर २ लाखांचे आणि अजित ऊर्फ भरत याच्यावर २ लाख रुपये असे एकूण १८ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरीक्त या चौघांचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

First published: