मुंबई, 8 जून : मुंबईकर म्हटले की, वडापाव आलाच. अनेक खवय्ये मुंबईतील प्रसिद्ध वडपाव सेंटरला (Street Food Vadapav) अनेकदा भेट देतात. वडापाव म्हणजे मुंबईकरांसाठी एक विशेष पर्वणीच असते. मुंबईमधे वडापावची सुरुवात जरी दादरमध्ये झाली असली तरी, आता मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी वडापाव विकलाच जातो. अशाच एका मुंबईच्या प्रसिद्ध ‘आराम’ वडापावबद्दल जाणून घेऊया… (The famous ‘Aaram’ Vadapav in Mumbai) तर या वडापावचं नाव आहे ‘आराम वडापाव’. कुठल्याही मुंबईकराला विचारलं की, आराम वडापाठ कुठंय, तर तो आराम वडापावचा पत्ता सांगतो. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरच सिग्नल ओलांडला की, समोरच एक गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी असते आरामचा वडापाव खाण्यासाठीच. वाचा :
Pune: पुण्याच्या या हटके मिसळीचा VIRAL VIDEO पाहिला असेल, आता पाहा त्यामागची गोष्ट
जवळजवळ 8 दशकं हा वडापाव विकला जातोय. म्हणजे ऑगस्ट 1939 साली तांबे कुटुंबियांना वडापावच्या व्यवसायात उतरलं आणि आजतागायत त्यांचं हे दुकान जोमानं सुरूय. आराम वडापाव सेंटरमद्ये सुरुवातील 5 रुपयांना वडापाव मिळत होता, आता काळ आणि महागाईनुसार त्याची किंमत 20 रुपये करण्यात आली आहे. अतिशय खमंग आणि टेस्टी असा हा वडापाव शुद्ध तेलातून बनविला जातो. स्वच्छतेचीदेखील काळजी घेतली जाते. आरामचा वडापाव खाणं ही एक खवय्यांसाठी मोठी पर्वणीच असते. विशेष करून सकाळच्या आणि सायंकाळी हा वडापाव खाण्यासाठी लोक गर्दी करतात. हजारो लोक दररोज हा वडापाव खाण्यासाठी येतात. ग्राहक संतोष बनसोडे म्हणतात की, “हा वडापाव खाण्यासाठी 3-4 वर्षांपासून येतोय. कारण, त्याची टेस्ट आणि या दुकानातील स्वच्छता. शुद्ध तेलापासून आरामचा वडापाव तयार केला जातो. त्यामुळे हा वडापाव खाण्यासाठी मी नेहमी येत असतो.” वाचा :
Curd Benefits: दह्यामध्ये घरातीलच या गोष्टी मिसळून खा; अनेक आजारांवर फायदा होईल
आराम वडापाव सेंटरचे मालक कौस्तुभ तांबे म्हणतात की, “आम्ही हा व्यवसाय अनेक वर्षं सांभाळत आहोत. श्रीरंग तांबे यांनी हा सुरू केला होता. पहिल्यांदा या वडापावची किंमत 5 रूपये होती. मात्र, आता आम्ही 20 रुपयांना हा वडापाव विकतो. वडपावचे विविध प्रकार आम्ही बनवतो. यामध्ये साधा वडापाव, मेयोनिज वडापाव, बटर वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव असे विविध प्रकार आमच्याकडे बनविले जातात. आमच्या वडापावमध्ये स्पेशल काय बनवत असेल तर शुद्ध आणि गरम फ्रेश वडापाव. हा वडापाव शुद्ध तेलातून बनविला जातो.”
गुगल मॅपवरून साभार…
मुंबईत कुठं मिळतो हा वडापाव? मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT Station) समोर चालत गेल्यानंतर 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. या आराम वडापावची किंमत 20 रुपये असून येथे साधा वडापाव, मेयोनिज वडापाव, बटर वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव, असे वडापावचे विविध प्रकार खायला मिळतात. दिवसभर हा वडापाव विकला जातो. या हाॅटेल मालकाशी संपर्क साधायचा असेल, तर 98200 86952 मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.