शिर्डी, 29 जानेवारी : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयावरून भाजपने जोरदार आक्षेप घेत विरोध सुरू केला आहे. पण, 'पिणारा कुठेही जातोच ना. वाईन आणि दारूमध्ये फार मोठा फरक आहे.' अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी दिली.
सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीवरून राजकीय आखाडा तापला आहे. भाजपने कडाडून विरोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते जशास तसे उत्तर देत निर्णय पटवून सांगत आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपला फटकारून काढले.
(IND vs WI : 19 वर्ष आणि 6 सीरिज, रोहित शर्माला इतिहास वाचवण्याचं आव्हान!)
'वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळात हे शेतकऱ्याचे उत्पादन आहे हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे, नाशिकमधील द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांनी धाडसाने काही गोष्टी केल्या आहे. असं आहे की, पिणारा कुठेही जातोच ना. वाईन आणि दारूमध्ये फार मोठा फरक आहे' अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
तसंच, भाजपचे लोक सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहे. आता नवीन गोष्ट असल्यामुळे दोन्ही बाजूने विरोध असू शकतो. जो विरोध होतोय तो नवीन गोष्ट असल्यामुळे आहे. दोन्ही बाजू असू शकतात' असंही थोरात म्हणाले.
वाईनमध्येही अल्कोहोल असतं - दानवे
दरम्यान, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत राज्य सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.
राज्य सरकारमध्ये काय चाललय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही जनतेलाही कळत नाही. काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्ये आम्ही दारूबंदी केली, हे सरकार सत्तेवर आलं नाही दारु सुरू केली. आता केवळ चंद्रपूरला दारू सुरू करून थांबले नाहीत, तर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागले. आज वाईन विकायला लागले, उद्या बिअर विकतील, पुढे दारू विकायला लागतील' अशी टीका दानवेंनी केली.
(Binomo सह नवीन आर्थिक संधींचे दरवाजे उघडा)
'या सरकारला उत्पन्न पाहिजे असेल तर अनेक रस्ते उत्पन्न वाढवण्यासाठी आहेत. पानटपरीवर दारू विकून किंवा दुकानात विकून पैसा उभा हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही. महाराष्ट्रातील संस्कृती अशी नाही, राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे. अजित पवार काय बोलले मला माहिती नाही पण वाईन मध्येही अल्कोहोल असतं. उद्या ते असंही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील', असंही दानवे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat