जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ....अन् मृतदेहाने धर्म बदलला, बुलडाण्यातील घटना, नेमकं काय घडलं?

....अन् मृतदेहाने धर्म बदलला, बुलडाण्यातील घटना, नेमकं काय घडलं?

नेहमीप्रमाणे अनोळखी मुस्लिम मृतदेहांवर शेगावातील या सुलतान ग्रुप कडून मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात होते.

नेहमीप्रमाणे अनोळखी मुस्लिम मृतदेहांवर शेगावातील या सुलतान ग्रुप कडून मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात होते.

नेहमीप्रमाणे अनोळखी मुस्लिम मृतदेहांवर शेगावातील या सुलतान ग्रुप कडून मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात होते.

  • -MIN READ Buldana,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलडाणा, 15 डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यात एका मृतदेहानेच धर्म बदलला असल्याची घटना उघडकीस आली आहे. मुस्लिम पद्धतीने होणारे सोपस्कार थांबवून मृतदेह पुन्हा एकदा पोलिसांना सुपूर्द केला आणि त्यानंतर हिंदू पद्धतीने अनोळखी मृतदेहावर कायदेशीर अंत्यविधी करण्यात आला. त्याचं झालं असं की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव - शेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला होता. मृत इसमाची ओळख पटली नसल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांनी तीन दिवस या मृताची ओळख पटवण्याचे आवाहन स्थानिकांना केले होते. मात्र तीन दिवस उलटूनही या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने आणि प्रथम दर्शनी हा मृतदेह मुस्लिम इसमाचा असल्याच वाटत असल्याने शेगाव शहरातील सुलतान नावाच्या सामाजिक ग्रुपला पोलिसांनी या मृतदेहावर मुस्लिम पद्धतीने अंतिम संस्कार करण्यासाठी हा मृतदेह सुपूर्द केला. (10 हजाराच्या उधारीसाठी मित्र मित्राच्या जीवावर उठला, यवतमाळमधील भयंकर घटना) नेहमीप्रमाणे अनोळखी मुस्लिम मृतदेहांवर शेगावातील या सुलतान ग्रुप कडून मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात होते.. अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडत असताना या मृतदेहाची तपासणी केली असता या मृत इसमाची खतना (लहानपणी मुस्लिम मुलांची करतात ती)झालेली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे हा मृतदेह हा मुस्लिम इसमाचा नसल्याचं सुलतान ग्रुपच्या लक्षात आलं. यावेळी अनोळखी मृतदेहावर मुस्लिम पद्धतीने होत असलेले सोपस्कार थांबविण्यात आले आणि हा मृतदेह सन्मानपूर्वक पोलिसांना हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला. (Nanded Student Suicide : आदिवासी आश्रम शाळेतील 10 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या, नांदेड हादरलं) अशाप्रकारे ओळख न पटलेल्या मृतदेहांवर जमिनीमध्ये दफनविधी केला जातो. अनोळखी मृतदेह हिंदू व्यक्तीचा असो वा मुस्लिम व्यक्तीचा त्यावर पुढील कायदेशीर बाबींचा विचार करता दफनविधीच केला जातो. त्यामुळे हा मृतदेह या सुलतानग्रुपकडून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावर हिंदू पद्धतीने अंतिमविधी करून दफन विधी करण्यात आला. त्यामुळे या अनोळखी मृतदेहाने अंतिम संस्काराच्या वेळेस धर्म बदलल्याचं बोलल्या जात आहे या प्रकारामुळे अजूनही एकमेकांच्या धर्मापुरी आदर असल्याचं या घटनेमुळे पाहायला मिळतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात