Home /News /maharashtra /

संतापजनक, गॅस संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला, तिसऱ्या दिवशी पुन्हा केले अंत्यसंस्कार

संतापजनक, गॅस संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला, तिसऱ्या दिवशी पुन्हा केले अंत्यसंस्कार

 तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले.

तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले.

तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले.

    मीरारोड, 08 सप्टेंबर : स्मशानभूमीमधील (Cemetery) गॅस दाहिनीतला गॉस संपल्यामुळे एक मृतदेह अर्धवट जळाला. त्यानंतर जेव्हा दाहिनीत पुन्हा गॅस भरण्यात आला त्यानंतर तिसऱ्या दिवशी उरलेला अर्धवट मृतदेह दहन करण्यात आल्याची संतापजनक घटना मीरा भाईंदर महापालिकेच्या (mira bhayandar municipal corporation) स्मशानभूमीत घडली आहे. या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. भाईंदर पश्चिमेस असलेल्या भोलानगर भागात महापालिकेच्या स्मशानभूमीत ही घटना घडली आहे. या स्मशानभूमीत गॅस वाहिनी आहे. तसंच, लाकडांच्या द्वारे सुद्धा अंत्यविधी केला जातो. मागील आठवड्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी दाहिनीतला गॅस संपल्याची घटना घडली, असं वृत्त दैनिक लोकमतने दिलं आहे. मात्र, गॅस संपल्यानंतर मृतदेह हा अर्धवटच जळाला होता. त्यामुळे मृतदेह तसाच राहिला होता. त्यामुळे गॅस सिलेंडर लगेच उपलब्ध करून देता आला असता पण तसे घडले नाही. मृतदेह हा आतमध्ये तसाच ठेवण्यात आला.  अर्धवट जळालेल्या मृतदेहावर लाकडावर जाळून दहन करणे अपेक्षित होते. पण, तसे घडले नाही. मृतदेह तब्बल तीन दिवस हा दाहिनीतच राहिला. Job Alert: शासकीय तंत्रनिकेतन नंदुरबार इथे 'या' पदासाठी होणार भरती तीन दिवसांनी मंगळवारी गॅस पुरवठा झाल्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहावर गॅस दाहिनीत पूर्णपणे अंत्यसंस्कार उरकले गेले. तीन दिवस तो अर्धवट जळालेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता. दाहिनीला गॅस पुरवठा पुन्हा पुर्ववत करण्यात आल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहावर पुन्हा एकदा अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पालिकेची अधिकारी, कर्मचारी हे जनतेच्या पैशावर कार्यलयात थाटतात, नगरसेवकांना कोट्यवधीचा निधी दिला जात असताना अशी घटना लाजिरवाणी आहे, मृतदेहाची ही विटंबना केली आहे, अशी टीका माजी नगसेवक मिलन म्हात्रे यांनी केली. T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, हे 15 शिलेदार संपवणार विजेतेपदाची प्रतीक्षा दरम्यान, गॅस संपल्यावर कर्मचाऱ्यांनी त्वरीत सांगणे गरजेचं होतं. गॅस नव्हता तर लाकडाचा वापर करून मृतदेह दहन करणे गरजेचं होतं, याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी दिलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या