जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, भिवंडीतील प्रकरणाला नवे वळण

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, भिवंडीतील प्रकरणाला नवे वळण

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, भिवंडीतील प्रकरणाला नवे वळण

त्यामुळे गेल्या 7 वर्षापासून सुरू असलेल्या मानहानी दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 29 जानेवारी : पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप (bjp) आणि काँग्रेस (congress) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात (bhiwandi court) सुरू असलेल्या खटला आता जलद गतीने चालणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची चिन्ह आहे. खासदार राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत महात्मा गांधी यांची हत्या आरएसएस कार्यकर्त्यांनी केल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यावर आज झालेल्या  सुनावणीवर प्रलंबित दाव्याची भिवंडी न्यायालयतच  जलदगतीने 5 फेब्रुवारीपासून दररोज सुनावणी केली जाणार असल्याचे आदेश भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश जे व्ही पालीवाल यांनी दिले आहे. ( 2 मुलींच्या आईच्या हातावर दिसला पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू, पती झाला हैराण ) आज भिवंडी न्यायालयामध्ये आरएसएस विरुद्ध राहुल  गांधी मानहानी प्रकरणाबाबत सुनावणी चालू असतांना फिर्यादी तर्फे ऍड प्रबोध जयवंत व आरोपीतर्फे ऍड. नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. न्यायाधीश पलीवाल यांच्या न्यायालयासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने सादर केसमध्ये 5 फेब्रुवारी 2022 अशी तारीख नेमलेली आहे.  सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा देत सदर केसची 5/2/22 रोजी पासून सदरचा खटल्यामध्ये प्रत्यक्षपणे दैनंदिन सुनावणी घेण्याचे आदेश मे. न्यायालयाने दिलेले आहेत, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील वकील नाना अय्यर  यांनी दिली. त्यामुळे गेल्या 7 वर्षापासून सुरू असलेल्या मानहानी दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात