औरंगाबाद, 7 मार्च : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Corona Patients) मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा (Lockdown) मार्ग अवलंबला जात आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) जिल्हाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे.
'15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण लॉक डाऊन करण्यापेक्षा अंशतः लॉक डाऊन लावण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. त्यानंतरही कोरोना रुग्ण वाढले तर कडक लॉकडाऊन लावण्यात येईल,' अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - वेगवान घडामोडी : राज ठाकरेंनंतर काँग्रेस नेत्यानेही लिहीलं मुख्यमंत्र्यांना पत्र
औरंगाबादमध्ये असे असतील नवे नियम?
- राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे
- शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार, विवाह सोहळे होणार नाहीत
- वाचनालय अध्ययन कक्ष 50 टक्के क्षमतेत सुरू राहतील
- प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन राहणार
- हॉटेल रात्री नऊ पर्यंत सुरू असतील नंतर बंद होतील, होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार, ग्रंथालय अर्ध्या क्षमतेने सुरू असतील
- शनिवार रविवार पूर्णतः लॉक डाऊन असेल, अत्यावश्यक सुविधा सुरू राहतील
- बुधवार पासून जाधववाडी मंडी पुढील सात दिवस पूर्णपणे राहणार बंद
- नागरिकांनी साथ दिली तर पूर्णतः लॉक डाऊनकडे जाण्यापासून शहर वाचेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Corona updates, Coronavirus, Lockdown