कल्याण, 20 जुलै : ज्याला आवड असते त्याला सवड मिळतेच ही म्हण कायमच आपण ऐकत असतो. याच म्हणीला अनुसरून कल्याण - डोंबिवली महापालिकेत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या सुरेश पवार यांनी त्यांच्या कलेची आवड जोपासली आहे. महापालिकेत कर्मचारी म्हणून तर ते उत्तम कार्य करत आहेतच या व्यतिरिक्त कलाकार म्हणूनही त्यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत. नाटक ते टिव्ही मालिका अशा अभिनयाच्या सर्वच क्षेत्रातील जबाबदाऱ्याही ते सहज पेलत आहेत. कष्टाचा प्रवास ‘लहानपणापासूनच मला अभिनय करायची आवड होती. आई लहानपणीच वारल्यानं माझी सर्व जबाबदारी वडिलांवर होती. ते चपला शिवण्याचं काम करत. डोक्यावर छप्परही नव्हतं. आम्ही रात्री एखादा आडोसा पाहून झोपलो आहोत. वडिलांनी घर घेतलं नसलं तरी मला कष्ट करुन शिकवले. मी 12 वी पर्यंत शिकलो. त्यानंतर वडिलही वारले. डोळ्यासमोर सर्व आंधार होता,’ असा खडतर अनुभव सुरेश यांनी सांगितला.
‘मी राखीव पोलीस दलात कामाला लागलो. पण, माझ्यातला कलाकार शांत नव्हता. मी त्या नोकरीतही नाटकात काम करत असे. कल्याण डोंबिवली महपालिकेत मध्ये सुरक्षा रक्षकाची पदभरती असल्याचे समजले. मी तात्काळ अर्ज भरला आणि माझी निवड झाली. मी कल्याणमध्ये राहण्यासाठी आलो. यावेळी येथील नाटक वेड्या मंडळींशी ओळख झाली आणि माझ्यातील कलाकाराला पुन्हा एकदा उभारी मिळाली,’ असं पवार यांनी सांगितलं. पालिका अधिकारी आणि कर्मचारी देतात साथ… कल्याण डोंबिवली महापालिका नाट्य विभागातर्फे मी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत असतो. गेली अनेक वर्ष या स्पर्धेत आमचा सहभाग आहे. मला या सगळ्या गोष्टींसाठी पालिका अधिकारी आणि कर्मचारी साथ देत असून मी माझ्या कामाची वेळ सांभाळून हे सर्व करतो. सकाळी 9 ते सायंकाळी 6 ही ड्युटी संपली की नाटकाची तालीम करतो असे पवार सांगतात. ‘बाईपण भारी…’ रुग्णांना तपासणारे हात जेव्हा केक बनवतात, सुपरस्टार अंकुशही आहे फॅन VIDEO राज्य नाट्य स्पर्धेत अनेक बक्षिसं राज्य नाट्य स्पर्धेत अनेक बक्षिसे त्यांनी मिळवली आहेत. दिग्दर्शन , अभिनय अशा विविध भूमिका त्यांनी पार पडल्या आहेत. ते व्यसनमुक्तीसाठीही काम करतात. या संदर्भात त्यांनी अनेक कविता रचल्या असून त्याचे कार्यक्रमही करतात. संत रविदास यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले असून त्यांच्यावर दोन तासांची डॉक्युमेंटरीही बनवली असल्याची माहिती त्यांनी दिली. संत रविदास यांच्या जीवनावरील पुस्तक देखील लिहिले असून दोन तासांची डॉक्युमेंटरी देखील बनवली आहे असे पवार सांगतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे ते सांगतात.