जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ‘बाईपण भारी…’ रुग्णांना तपासणारे हात जेव्हा केक बनवतात, सुपरस्टार अंकुशही आहे फॅन VIDEO

‘बाईपण भारी…’ रुग्णांना तपासणारे हात जेव्हा केक बनवतात, सुपरस्टार अंकुशही आहे फॅन VIDEO

‘बाईपण भारी…’ रुग्णांना तपासणारे हात जेव्हा केक बनवतात, सुपरस्टार अंकुशही आहे फॅन VIDEO

होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या पूजा सावंत आज सेलिब्रेटी बेकर बनल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जुलै : आपण जी नोकरी करतो त्यामध्ये आपलं मन रमत नाही, असं अनकेदा होतं. तुमच्या आतला ‘कलाकार’ तुम्हाला वारंवार या गोष्टींची जाणीव करून देत असतो. त्यातील काही जण हा आतला आवाज ऐकतात. आवडीच्या क्षेत्रात पाऊल ठेवतात आणि त्यामध्ये यशस्वी होतात. होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या मुंबईच्या पूजा सावंत यांच्याबाबतीतही हा प्रकार घडलाय. डॉक्टर ते सेलिब्रेटी बेकर असा त्यांचा प्रवास आहे. मुंबईतल्या गोरेगाव परिसरात राहणाऱ्या पूजा सावंत यांनी 2012 मध्ये होमिओपॅथीमध्ये एमडी केलं. त्यानंतर स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली. या कालावधीत रिकामा वेळ सत्करणी लावण्यासाठी त्यांनी बेकिंगला सुरुवात केली. आज त्या डॉक्टर आणि बेकर्स अशा दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. ग्राहकांना हव्या त्या पद्धतीनं कस्टमाईज केक बनवण्याची त्यांची खासियत असून ‘पूजा बेक बाय हार्ट’ हे त्यांचं प्रॉडक्ट सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय झालंय.

News18लोकमत
News18लोकमत

‘हल्ली लोकांना काहीतरी हटके वेगळ्या संकल्पना असलेले कस्टमाइज केक हवे असतात. ऑनलाईन वेबसाईटवरवर दिसणारे फॅन्सी, ट्रेंडी केक, जे चवीला चविष्ट हवे. सर्व साधारण बेकरीत मिळणारे तेच टीपीकल डिजाईनचे केक प्रीमिक्स वापरून त्यात तेल, पाणी, स्पॉंजी व्हायला जेल अशी रसायन टाकून बनवतात. त्यामुळे केक करताना होमबेक आणि डाॅक्टर म्हणून जास्त सजग रहावं लागतं. कोव्हिड 19 मुळे तर स्वच्छतेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय.  केक करताना जबाबदारी वाढली आहे, असं डॉ. पूजा यांनी सांगितलं. ‘मी आजपर्यंत अंकुश चौधरी - दीपा परब यांच्या लग्नाचा वाढदिवस, केदार शिंदे यांची मुलगीसनाचा वाढदिवस, अनेक चित्रपटांचे यशस्वी प्रयोग, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा  चित्रपटासाठी केक अशा अनेक सेलिब्रेटींसाठी कस्टमाईज केक्स आणि कप केक्स तयार केले आहेत,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. तुम्हाला माहितीये का पहिला अमृततुल्य चहा कुठे तयार झाला? Video निरीक्षण आणि कल्पकतेची सांगड घालून जास्तीत जास्त रियलिस्टिक केक बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. बेकिंग करताना अगदी छोट्या गोष्टीचा विचार करून बेकिंग करण्यावर माझा नेहमी भर असतो.  मी कविता करते. माझ्या केकना तो खास टच देण्याचा प्रयत्न करते. खूप वेळा साधं हॅप्पी बिर्थडे मेसेज न लिहिता कवितेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करते. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असेल तर समोरच्या स्त्रीला लागणारे डोहाळे यांची लहान लहान छोटे मिनीचर तयार करून ते केकमध्ये ठेवले जातात. त्यामुळे तो केक आणखी उठावदार दिसतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या केक असेल तर संबंधित जोडप्याने घातलेले हुबेहूब कपडे त्याचा रंग आणि त्या प्रकारची सजावट या सर्व गोष्टींचा विचार करुन केक करण्याचप्रयत्न करते,’ असं पूजा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात