भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी कल्याण, 21 जून : साडी हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यातच जर कोणी 100 रुपयात साडी विक्री करत असेल तर… त्या दुकानामध्ये महिलांची मोठी गर्दी होईल. कल्याणमधील एका ठिकाणी चक्क 100 रुपयांपासून साड्या मिळतायत. त्याचबरोबर अन्य साड्याही कमी किंमतीमध्ये घेण्याची संधी इथं उपलब्ध आहे. कोणत्या साड्या मिळतात? अनेक महिला घरकाम करताना आजही साड्या नेसतात. घरकाम करताना सातत्याने वापर झाल्यानं साड्या खराब होतात. त्यामुळे साध्या साड्या वापराव्या लागतात. त्याचबरोबर गरीब घरातील महिलांनाही महागडी साडी खरेदी करणे शक्य नसते. या सर्वांसाठी कल्याणमधील न्यू टेक्सटाइल मार्केटमध्ये 100 रुपयांपासून साड्या उपलब्ध आहेत, अशी माहिती या दुकानाचे मालक शिवराज पाटील यांनी दिली.
मुळचे लातूरचे असलेले शिवराज यांनी एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलंय. नोकरी केल्यापेक्षा व्यवसाय करण्याची आपली इच्छा होती. त्यामधून हे शॉप सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. नेहमीच्या वापरातील साध्या साड्यांप्रमाणेच कांजीवरम, पैठणी, पेशवाई, सेमी पैठणी, ऑर्गेंझा, गार्डन या साड्या देखील इथं खरेदी करता येतात. बांधणीचे ड्रेस सर्वात स्वस्त मिळणारी मुंबईतील जागा, कमी पैशांमध्ये होईल मस्त शॉपिंग, Video या सर्व साड्या येवला, सुरत, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधून आम्ही मागवतो, असं त्यांनी सांगितलं. काही महिलांना रंग तर काही महिलांना डिझाईन आवडते. सध्या इंग्लिश कलर घेण्याकडे महिलांचा कल अधिक आहे. विशेष म्हणजे काठ पदर साड्या घेतानाही बारीक काठ, जाड काठ पदरावरील डिझाईन नेमकी कशी आहे हे सर्व पाहूनच महिला खरेदी करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. कुठं करणार खरेदी? न्यू टेक्सटाइल मार्केट, वेद हॉस्पिटल जवळ, कल्याण भिवंडी रोड , कल्याण (प) वेळ - सकाळी 10 ते रात्री 9.30