जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kalyan News : कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार, पाहा कसा झाला चिमुरड्या हर्षदाचा प्रवास, Video

Kalyan News : कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार, पाहा कसा झाला चिमुरड्या हर्षदाचा प्रवास, Video

Kalyan News : कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार, पाहा कसा झाला चिमुरड्या हर्षदाचा प्रवास, Video

कल्याणच्या चाळीत राहणारी चिमुरडी हर्षदा आता टीव्ही स्टार झालीय. कसा केला तिनं हा प्रवास?

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी कल्याण 8 जून : गुणवत्ता असेल तर ती लपत नाही. कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. लहान वयातही मोठं आव्हान पेलू शकता. हे कल्याणच्या हर्षदा कांबळेनं दाखवून दिलंय. एका चाळीत राहणारी ही 9 वर्षांची चिमुरडी टीव्ही इंडस्ट्रीमधील स्टार बनलीय. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं कामातून ठसा उमटवलाय. चाळीत राहणाऱ्या या मुलीचा स्टारपर्यंतचा प्रवास हा फक्त गुणवत्तेच्या जोरावर झालाय. कशी झाली सुरूवात? हर्षदाचे वडिल विक्रांत कांबळे हे ठाण्यात नोकरी करतात. ते कामातून वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रमात निवेदन आणि गाणी सादर करत. त्यावेळी ते हर्षदालाही तिथं घेऊन जात. हर्षदालाही याची आवड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तिला डोंबिवलीचे डॉ. ज्ञानेश्वर सकपाळ यांच्या बालनाट्य शिबिरात पाठवलं. या शिबिरात तिला अभिनयाचे पहिले धडे मिळाले, अशी माहिती विक्रांत यांनी दिली.

News18लोकमत
News18लोकमत

‘माझी तुझी रेशीमगाठी’ या मालिकेसाठी ठाण्यात ऑडिशन आहेत, अशी माहिती हर्षदाच्या घरच्यांना कळाली. त्यावेळी हर्षदानं तिथं ऑडिशन दिली. त्या मालिकेत परीची मैत्रिण म्हणून हर्षदाची निवड झाली. हर्षदानं त्यानंतर ‘रंग माझा वेगळा’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांमध्ये काम केलंय. त्याचबरोबर ‘लव्ह कनेक्शन’ हा हिंदी सिनेमाही केला आहे,’ असं हर्षदाची आत्या मीना कांबळे यांनी सांगितलं. Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video ‘मला कॅमेऱ्यासमोर काम करायला खूप आवडतं. शूटिंगच्या दरम्यान संपूर्ण फोकस माझ्यावर होता. त्यावेळी मी घाबरले नाही. मला काम करताना खूप मजा आली, ’ असं हर्षदानं सांगितलं. लहान वयातच प्रमुख मालिकांमध्ये काम करणाऱ्या हर्षदाचा आम्हाला अभिमान असल्याची भावना तिच्या शेजाऱ्यांनी व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात