जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News : श्वान पाळणे इतकं सोप्पं नाही, आधी ही माहिती जाणून घ्या

Nagpur News : श्वान पाळणे इतकं सोप्पं नाही, आधी ही माहिती जाणून घ्या

Nagpur News : श्वान पाळणे इतकं सोप्पं नाही, आधी ही माहिती जाणून घ्या

Nagpur News : श्वान पाळणे इतकं सोप्पं नाही, आधी ही माहिती जाणून घ्या

घरी श्वान घेण्याच्या विचारात आहात तर त्यापूर्वी काही बाबी लक्षात घेऊन श्वान निवडणे गरजेचे आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 9 जुलै : आपल्या घरी एखादा श्वान असावा असे अनेकांचे स्वप्न असतं. आजघडीला बाजारात अनेक देशी विदेशी प्रजातीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येक श्वानाची आपली अशी काही खास वैशिष्ट्ये,स्वभाव आणि प्राथमिक गरजा आहेत. आपण देखील घरी श्वान घेण्याच्या विचारात आहात तर त्यापूर्वी काही बाबी लक्षात घेऊन श्वान निवडणे गरजेचे आहे. श्वान आणि आपले दैनंदिन जीवन यातील तारतम्य बाळगून जर योग्य श्वान निवडल्यास श्वान आणि श्वान पालक यांच्यात उत्तम समन्वय राहण्यास मोठी मदत होऊ शकते. नागपूरमधील श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांनी या विषयी अधिक माहिती दिली आहे. जडणघडणीमध्ये या बाबींची पूर्तता सर्वप्रथम आपण आपली दैनंदिन काळ वेळ आणि आपण आपल्या श्वानाला किती वेळ देऊ शकणार आहोत यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कारण कुठलीही ब्रिड निवडण्यापूर्वी त्याच्या इंटेलिजन्स पेक्षा कॅरेक्टर वर ठरत असते. त्यानुसार आपण कुठला श्वान घ्यावा हे ठरवणे महत्त्वाचे आहे. श्वानाच्या जडणघडणीमध्ये फिजिकल, मेंटल आणि स्टेमुलेशन इत्यादी बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. कारण कुठलाही श्वान हा आपल्या सोबत केवळ दोन-तीन महिने नाही तर त्याचे दहा ते बारा वर्षाचे आयुष्य तो तुमच्या समवेत काढणार आहे. या लॉंग टर्मनुसार श्वानाची ब्रिड निवडणे गरजेचे आहे. प्रत्येक श्वान हा आपल्यामध्ये थोड्या अधिक फरकाने विशेष असून प्रत्येक ब्रिड त्याचे ओरिजिन वरून तयार झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पूरिपूर्ण माहिती घेतल्यास श्वान निवडणे फार अवघड नाही लैब्राडोर रिट्रीवर, गोल्डन रिट्रीवर, हे रिट्रीवर जातीतून येतात. या ब्रिडमध्ये आपल्याला कायम आपल्याशी मस्ती करू पाहणाऱ्या, कायम उत्साही, घरातील कुठल्याही वस्तूशी खेळू पाहणारे, असे अनेक कॅरेक्टर मिळतील. हा त्यांचा मूळ स्वभाव गुण असून ते त्यांच्या स्वभावानुसार वागत असतात. तसेच जर्मन शेफर्ड हा श्वान कायम मालकाच्या मागे पुढे करू पाहतो, मालकावर अतिशय जीव लावून कायम कुतूहलापोटी मालकाकडे लक्ष ठेवून असतो. आश्वान कायम रेडू टू वर्क असून तो अतिशय आज्ञाकारी असतो. मुळात हा श्वास एक हंटिंग ब्रिड मधून येतो. म्हणून याला वॉच डॉग म्हणून देखील ओळखले जाते. बऱ्याचदा हा श्वान पोलीस पथकामध्ये देखील बघायला मिळतो. हस्की प्रजातीच्या श्वानाबद्दल बोलायचं झालंतर हा एक स्वतंत्र विचारधारा असलेला श्वान आहे त्याची स्वतःची आपली अशी एक खास ब्युटी आहे. हा बहुतांश बर्फाळी प्रदेशातून येत असून इतरांपेक्षा हा भरपूर वेगळा आहे.

Nagpur News: ‘जर्मन शेफर्ड’ खरंच शिकारीसाठी वापरला जातो का? तुम्हाला माहिती नसेल पण…

शिहत्झू हा अतिशय गोंडस श्वान असून त्याची केसांची सुंदरता हीच खरी ओळख आहे. मात्र बहुतांश वेळा असं बघितल्या गेले आहे की श्वानपालक त्यांच्या केसांची झिरो ट्रिम करून त्याची मूळ सुंदरताच घालवून देतात. काही गोष्टी या अज्ञानातून होतात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने होत असतात. मात्र श्वान घेत असताना आपली प्राथमिक गरज आणि आपल्या डेली रुटीन लक्षात घेऊन श्वानाची स्वभाव गुणवैशिष्ट्य तो मुळात कुठल्या प्रजातीचा श्वान असून त्याची परिपूर्ण माहिती घेतल्यास श्वान निवडणे फार अवघड नाही, असं मत श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांनी बोलताना व्यक्त केले.

Ahmednagar News: लॅब्रेडोर की जर्मन शेफर्ड कोणता श्वान पाळणं महाग? पाहा या 5 श्वानांसाठी किती येतो खर्च?

श्वान निवडताना श्वानाची प्राथमिक गरज तसेच मानसिक शारीरिक आणि श्वान मालकाचे वेळेचे नियोजन हे बघून श्वान निवडावे. बरेच लोक श्वानाच्या शारीरिक गरजेकडे लक्ष देतात त्यांच्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष देतात मात्र श्वानाचे मानसिक संतुलन राखणे फार गरजेचे आहे. त्यांच्या ग्रुमिंग, एक्सरसाइज, फिजिकल, मेंटल आणि ट्रेनिंग या सगळ्या बाबी श्वानांच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचे असतात, अशी माहिती श्रीकांत वाढी यांनी बोलताना दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात