कल्याण, 24 जुलै : एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर कितीही अडचणीमध्ये ती पूर्ण करता येते. टीव्ही आणि सिनेमात गाजलेला चेहरा असलेल्या प्रकाश भागवत यांच्याबाबत ही गोष्ट चपखलपणे लागू होते. येड्यांची जत्रा या सिमेमातील बाबूराव या भूमिकेनं लोकप्रिय झालेल्या प्रकाश यांचा आजवरचा प्रवास सरळ नव्हता. लहान वयात रसवंती गृहात काम केलेल्या या कलाकारानं ंमोठ्या कष्टानं मनोरंजन विश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलंय. कसा झाला प्रवास? मुळच्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रकाश यांचं वडील किर्तनकार होते. प्रकाश यांना लहाणपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असताना ते शिक्षकाची नक्कलही करत. यावरुन शिक्षकांचा मार खाल्ल्याची आठवणही ते सांगतात. दहावीला नापास झाल्यानं त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला धक्का बसला. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचंही निधन झालं.
सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेल्या प्रकाश यांनी रसवंती गृहात काम करण्यास सुरूवात केली. रसवंतीगृहात काम करत असतानाच त्यांनी एका वाहिनीवरील हास्यसम्राट या कार्यक्रमाची जाहिरात पाहिली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. या अपयशानंतर न खचता त्यांनी पुन्हा ऑडिशन दिली. त्यानंतर त्यांची निवड झाली आणि त्यांनी थेट मुंबई गाठली. त्यांनी सिनेमात काम करण्याबरोबरच अनेक गाण्याचंही लेखन केलं आहे. त्याबरोबर विनोदी मालिकांमध्येही काम केल्याची माहिती प्रकाश यांनी दिलीय. रस्त्यावर झोपला पण जिद्द सोडली नाही, महापालिका कर्मचारी बनला नाटकामध्ये स्टार! Video प्रकाश भागवत यांनी आजवर सुपरस्टार, ढोलकी, 4 इडियट , जस्ट गंमत, येड्यांची जत्रा या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर मकरंद अनासपुरे , निळू फुले , अशोक सराफ , दादा कोंडके यांची नक्कल देखील हुबेहुब करतात.