जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू, एकाच दिवशी झाले होते पोलीस दलात भरती

जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू, एकाच दिवशी झाले होते पोलीस दलात भरती

पोलीस दलातील दोन जुळे भाऊ कोरोनाच्या लढ्यात शहीद झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

ठाणे, 30 जुलै : कोरोनाच्या संकटात खाकी वर्दीतील कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. मात्र कर्तव्य बजावत असताना अनेक जण या महामारीमुळे शहीद झाले. पोलीस दलातील दोन जुळे भाऊ कोरोनाच्या लढ्यात शहीद झाल्याची घटना समोर आली आहे.

दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके अशी पोलीस असलेल्या या जुळ्या भावांची नावं. दिलीप आणि जयसिंग हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. यापैकी दिलीप हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

8 दिवसांपूर्वीच म्हणजेच 20 जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर 28 जुलै रोजी जयसिंग यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. अवघ्या 8 दिवसांच्या फरकाने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ पोलीस ठाणे आणि हिललाईन पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकार्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - 10 लाख कोरोना रुग्ण झाले ठणठणीत; लोकसंख्येच्या तुलनेत जगात सर्वांत कमी मृत्यू भारतात

दरम्यान, राज्यभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज 11 हजार 147 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 48 हजार 150 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आज 266 जणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2020, 10:06 PM IST

ताज्या बातम्या