जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यातील पहिली मोठी कारवाई, विनाकारण भीती दाखवून अ‍ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका

राज्यातील पहिली मोठी कारवाई, विनाकारण भीती दाखवून अ‍ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका

राज्यातील पहिली मोठी कारवाई, विनाकारण भीती दाखवून अ‍ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका

ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 7 जून : रुग्णांना विनाकारण भीती दाखवून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणून ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे. या खासगी हॉस्पिटलला पालिकेकडून 16 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांककडून हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रार आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकशी करुन या दोन हाॉस्पिटलवर कारवाई केली आहे. हेही वाचा - रुपेरी पडद्यावरील खलनायक ठरला हिरो, अभिनेता सोनू सूदवरून राजकारण पेटलं! अशा प्रकारे नागरिकांची पिळवणूक झाल्यानंतर त्या हॉस्पिटलवर कारवाई होणे ही राज्यातील पहिलीच वेळ असून यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्यांना चपराक बसण्यास मदत होईल. ठाण्यात या आधीदेखील अशा तक्रारी आल्या होत्या. तसंच थायरो केअर नावाच्या एका लॅबला ठाणे महानगर पालिकेने स्वॅब टेस्ट न करण्याची नोटीस धाडली. काही लॅबने स्वॅब टेस्ट केल्या होत्या. मात्र त्यांचे अहवाल हे चुकीचे आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात