जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सिक्कीममध्ये कारचा भीषण अपघात, ठाण्यातील एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये कारचा भीषण अपघात, ठाण्यातील एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये कारचा भीषण अपघात, ठाण्यातील एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू

ठाण्यात वास्तव्यास असलेलं एक कुटुंब फिरण्यासाठी सिक्कीमला गेलं असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हे कुटुंब सिक्किमध्ये फिरायला गेलं असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 29 मे : ठाण्यातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ठाण्यात वास्तव्यास असलेलं एक कुटुंब फिरण्यासाठी सिक्कीमला गेलं असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हे कुटुंब सिक्किमध्ये फिरायला गेलं असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच्या बातमीमुळे ठाणे शहर हळहळलं आहे. सिक्कीममध्ये झालेल्या या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार जण हे एकाच कुटुंबातील होते. तर एक व्यक्ती त्यांचा नातेवाईक होता. मृतकांची कार दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील एकाच कुटुंबातील हे पाच सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (28 मे) विमानाने सिक्कीमला गेले होते. तिथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली होती. मात्र, प्रवासात ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की कारमधील पाचही व्यक्तींचा मृत्यू झाला. मागील 15 वर्षांपासून हे कुटुंब ठाण्यात रहात होतं. ( शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडू नये, राज्यात खरीप हंगामाला पुरेल एवढा खतांचा साठा ) मृत व्यक्तींची नावे : सुरेश पूनामिया तोराल पूनामिय हिरल पुनामिया देवांशी पूनमिया तर पाचवा व्यक्ती हा त्यांच्या जवळचा नातेवाईक आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात